Sugarcane Season  Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Season : पुन्हा अतिरिक्त उसाचा प्रश्न उभा राहणार

Excessive Sugarcane : साखर कारखान्यांचा हंगाम अंतिम टप्प्याकडे वाटचाल करतो आहे. मात्र अंबड व घनसावंगी तालुक्यात अनेक शेतकऱ्यांच्या शेतात ऊस उभा आहे.

Team Agrowon

Jalna News : साखर कारखान्यांचा हंगाम अंतिम टप्प्याकडे वाटचाल करतो आहे. मात्र अंबड व घनसावंगी तालुक्यात अनेक शेतकऱ्यांच्या शेतात ऊस उभा आहे. वेळेत पाणी न मिळाल्याने व उन्हामुळे उसाच्या एकरी टनात घट होत आहे. तोडणी मजुरांचा प्रश्न असल्याने शेतकरी कारखान्यांच्या यंत्रणांकडे ऊसतोडीसाठी विणवण्या करताना दिसत आहे.

जिल्ह्यातील मार्च महिना उजाडला तरी अनेकांच्या शेतात अजूनही उस उभा आहे. ऊसतोड कामगार मिळत नसल्याने ऊस उत्पादक शेतकरी हैराण झाले आहेत. घनसावंगी तालुक्यातील उत्तर भागातील हिरवागार ऊस आता खोडव्यासारखा दिसत असल्याने शेतकऱ्यांपुढे मोठं संकट निर्माण झाले आहे.

बारमाही चाललेल्या विहिरी आता ७ ते ८ महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. दुष्काळी परिस्थितीही शेतकऱ्यांना ऊस तोडी वेळेत मिळत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. साखर आयुक्तांकडून १५ एप्रिलला कारखाने बंद करण्याची शक्यता आहे.

नाही म्हणायला मराठवाड्यातील इतर कारखाने मार्च अखेर बंद होण्याची शक्यता आहे तर जालना आणि बीड जिल्ह्यांतील काही कारखाने एप्रिल महिन्यातही सुरू असतील अशी सूत्रांची माहिती आहे.

दुसरीकडे घनसावंगी, अंबड तालुक्यांत कारखान्यांकडे क्षमतेपेक्षा अधिक नोंद आहे. परंतु मजूर मिळणार नाही, अशा दुहेरी कात्रीत साखर कारखानदार सापडले आहेत. उपलब्ध उसासाठी कारखाने सुरू ठेवण्यात येतीलही; मात्र मजूर आणायचे कोठून, हा प्रश्न आहे.

शेतकऱ्यांनी कारखान्याकडे उसाची नोंद देऊनही सुधारित उसाच्या जातीचे १२ महिन्यांत गाळप आवश्यक आहे. नाहीतर शेतकऱ्यांना एकरी ५ ते १० टन नुकसान सहन करावे लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे होणारी नुकसानभरपाई कोण देणार असा प्रश्न ऊस उत्पादकांनी उपस्थित केला आहे.

‘उसाचे क्षेत्र संपल्याशिवाय कारखाने बंद करू नका’

उसाचे क्षेत्र संपल्याशिवाय कारखाने बंद करू नयेत, अशी मागणी रामप्रसाद खरात यांनी साखर आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली होती. त्याची दखल घेऊन अतिरिक्त ३ लाख टन उसाचे नियोजन केले. कुठल्याही शेतकऱ्याचा ऊस शिल्लक राहणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना साखर आयुक्त यांनी दिल्या आहेत. जिल्ह्यातील घनसावंगी, अंबडसह अन्य काही जिल्ह्यांत ऊसक्षेत्र जास्त आहे. त्यामुळे १५ एप्रिलनंतरही साखर कारखान्यांचे गाळप सुरू राहणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Wheat Export India : २५ लाख टन गहू निर्यातीला मंजुरी; शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय, केंद्र सरकारचा दावा

Mulberry Cultivation Registration: मराठवाड्यात ३५४७ एकरांवर तुती नोंदणी

Bale Silages Uses: मुरघास साठवणीची नवी पद्धत; बेल सायलेज कसे बनवतात?

Lemongrass Farming: काँक्रीटच्या जंगलाला नाकारत फुलविली ‘सुगंधाची शेती’

Fodder Production: चारा उत्पादनावर परिणाम करणारे घटक

SCROLL FOR NEXT