Sugarcane Season : पाच जिल्ह्यात सात साखर कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला

Sugarcane Crushing : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड सह खानदेशातील जळगाव व नंदुरबार मिळून पाच जिल्ह्यातील ७ कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला आहे.
Sugar Factory
Sugar FactoryAgrowon

Chhatrapati Sambhajinagar : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड सह खानदेशातील जळगाव व नंदुरबार मिळून पाच जिल्ह्यातील ७ कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला आहे. त्यामुळे यंदाच्या गाळपात सहभाग घेणाऱ्या २२ पैकी १५ कारखान्यांचे ऊस गाळप आजच्या घडीला सुरू आहे. मार्चअखेर जालना जिल्ह्यातील दोन-तीन कारखान्याचा अपवाद वगळता उर्वरित सर्व कारखाने हंगाम आटोपता घेण्याची चिन्हे आहेत.

यंदाच्या ऊस गाळप हंगामात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सहा, जालन्यातील पाच, बीडमधील सात तसेच नंदुरबार व जळगाव या दोन्ही जिल्ह्यातील प्रत्येकी दोन मिळून २२ कारखान्यांनी सहभाग नोंदविला होता. या सहभाग नोंदविलेल्या कारखान्यांपैकी जळगाव व नंदुरबार मधील चार कारखान्यांनी आपले ऊस गाळप थांबविले आहे. याशिवाय बीडमधील दोन कारखान्यांचेही ऊस गाळप आटोपले आहे.

Sugar Factory
Sugarcane Season : ...अन्यथा उसाच्या फडाला आग लावून आत्मदहन करू

जालना जिल्ह्यातील एका कारखान्याचे ऊस गाळप जानेवारीतच थांबले होते. सर्व बाबीस कारखान्यांनी २७ फेब्रुवारी अखेरपर्यंत ८३ लाख ६७ हजार ९२८ टन उसाचे गाळप करत सरासरी ८.६९ टक्के साखर उताऱ्याने ७२ लाख ६७ हजार ८०८ क्विंटल साखरेचे उत्पादन केले.

गतवर्षी जवळपास १ कोटी ९ लाख टन उसाचे गाळप या पाचही जिल्ह्यांमध्ये झाले होते. यंदा ९५ लाख ते १ कोटी टन उसाचे गाळप होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे गतवर्षीच्या तुलनेत यंदाचे ऊस गाळप थोडे कमी होण्याची शक्यता असली तरी इथेनॉलवर बंदी असल्याने साखरेचे उत्पादन मात्र गतवर्षी एवढेच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गुऱ्हाळांची संख्या वाढली

कारखान्यांना उपलब्ध झालेल्या उसासोबतच यंदा गुऱ्हाळांची संख्या वाढल्याची स्थिती आहे. काही भागात तर कारखाने आणि गुऱ्हाळांची ऊस गाळतात स्पर्धा असल्याचे गुऱ्हाळ व कारखान्यांनी केलेल्या ऊस गाळपावरून पुढे येत, असल्याची माहिती साखर

विभागाच्या सूत्रांनी दिली. पैठण, माजलगाव, अंबड, घनसांगवी यासह अनेक तालुक्यात यंदा गुऱ्हाळ वाढले असल्याचे चित्र आहे.

Sugar Factory
Sugarcane Season : गळीत हंगाम मंदावला

गुऱ्हाळांची संख्या वाढली

कारखान्यांना उपलब्ध झालेल्या उसासोबतच यंदा गुऱ्हाळांची संख्या वाढल्याची स्थिती आहे. काही भागात तर कारखाने आणि गुऱ्हाळांची ऊस गाळतात स्पर्धा असल्याचे गुऱ्हाळ व कारखान्यांनी केलेल्या ऊस गाळपावरून पुढे येत, असल्याची माहिती साखर

विभागाच्या सूत्रांनी दिली. पैठण, माजलगाव, अंबड, घनसांगवी यासह अनेक तालुक्यात यंदा गुऱ्हाळ वाढले असल्याचे चित्र आहे.

जिल्हानिहाय कारखाने ऊस गाळप (टनमध्ये)

जिल्हा नंदुरबार

कारखाने २

ऊस गाळप ९ लाख २५ हजार २९५

साखर उत्पादन ८ लाख ०२ हजार ०८४

जिल्हा जळगाव

कारखाने २

ऊस गाळप १ लाख ९१ हजार १९७

साखर उत्पादन १ लाख ७३ हजार ९७७

जिल्हा छत्रपती संभाजीनगर

कारखाने ६

ऊस गाळप १६ लाख ३७ हजार १२८

साखर उत्पादन १५ लाख ८० हजार ८२०

जिल्हा जालना

कारखाने ५

ऊस गाळप २१ लाख २३ हजार ८७१

साखर उत्पादन १९ लाख ४२ हजार ५४५

जिल्हा बीड

कारखाने ७

ऊस गाळप ३४ लाख ९० हजार ४३६

साखर उत्पादन २७ लाख ६८ हजार ३८२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com