Paddy Harvesting  Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Harvesting : पावसाच्या उघडिपीनंतर पहिल्या टप्प्यातील भातपीक कापणी सुरू

Paddy Farming : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. त्यानंतर गेले दोन- तीन दिवस जिल्ह्याच्या काही भागात सायकांळी ढगफुटीसदृश पाऊस झाला.

Team Agrowon

Sindhudurg News : जिल्ह्यात पावसाने उघडीप देताच शेतकऱ्यांनी पहिल्या टप्प्यातील भातपीक कापणीला सुरुवात केली आहे. पहिल्या टप्प्यात लागवड केलेली पाच टक्के पिके कापणीयोग्य झाली आहेत.

जिल्ह्यात गेले काही दिवस जोरदार पाऊस सुरू होता. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. त्यानंतर गेले दोन- तीन दिवस जिल्ह्याच्या काही भागात सायकांळी ढगफुटीसदृश पाऊस झाला.

पावसामुळे जिल्ह्यात परिपक्व झालेल्या भातपिकांची कापणी रखडली होती. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात लागवड केलेल्या पाच टक्के भातपिके पूर्णतः परिपक्व झाली आहेत. याशिवाय दुसऱ्या टप्प्यातील पिके देखील परिपक्व होण्यास सुरुवात झाली आहे. परंतु पावसामुळे शेतकऱ्यांना कापणी करता येत नव्हती.

मात्र शुक्रवारी (ता.६) दिवसभर पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतकऱ्यांनी भातकापणी करण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील खारेपाटण, चिंचवली आणि परिसरातील काही गावांमध्ये भातकापणीला शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. या भागात मोठ्या प्रमाणात पिके परिपक्व झाली आहेत.

जिल्ह्याच्या इतर भागात देखील भातपिके कापणीयोग्य झाली आहेत. दुसऱ्या टप्प्यात लागवड केलेली पिके देखील येत्या चार-पाच दिवसांत कापणीला येतील असा अंदाज आहे. पावसाने उघडीप दिल्यास येत्या आठ दिवसांत कापणीला गती येण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT