Weather Update Pune : अरबी समुद्रामधील कमी दाबाचे क्षेत्र ठळक झाल्याने शनिवारी (ता. २१) तेज चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे. आज (ता. २४) प्रणाली तीव्र होऊन अतितीव्र चक्रीवादळ घोंघावणार आहे. हे चक्रीवादळ भारताच्या पश्चिम किनाऱ्यापासून दूर येमेन आणि ओमान कडे सकरत असून, या प्रणालीचा महाराष्ट्रावर कोणताही प्रभाव होणार नाही.
नैर्ऋत्य अरबी समुद्रात घोंघावणारे 'तेज' चक्रीवादळ येमेनच्या सोकोट्रा बेटापासून ६०० किलोमीटर पूर्वेकडे, एल घाईदाह पासून ९८० किलोमीटर आग्नेयेकडे तर ओमानच्या सलालाह पासून ९२० किलोमीटर आग्नेयेकडे अरबी समुद्रात आहे. हे चक्रीवादळ बुधवारपर्यंत (ता. २५) येमेन आणि ओमानच्या किनारपट्टीला धडकण्याचे संकेत आहेत.
('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
दरम्यान, आग्नेय बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्र ठळक झाले आहे. या प्रणालीची तीव्रता वाढणार असून, आज (ता. २२) तीव्र कमी दाबाचे क्षेत्र (डिप्रेशन) तयार होणार आहे. पूर्व किनाऱ्याजवळ आल्यानंतर ही प्रणाली ईशान्येकडे वळून पश्चिम बंगाल आणि बांग्लादेश सरकण्याची शक्यता आहे. या प्रणालीची तीव्रता आणखी वाढण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.
दक्षिण भारतात ईशान्य मॉन्सून दाखल
बंगालच्या उपसागरातील ठळक कमी दाब क्षेत्र आणि कोमोरिन भागावर असलेल्या चक्राकार वाऱ्यांमुळे बंगालच्या उपसागरावरून येणारे वाऱ्यांचे प्रवाह बळकट झाले आहेत. पोषक वातावरणीय स्थितीमुळे शनिवारी (ता. २१) तामिळनाडू आणि केरळ राज्यात ईशान्य मोसमी वारे (ईशान्य मॉन्सून) दाखल झाल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.