Amul In Andhra Pradesh Controversy Agrowon
ॲग्रो विशेष

Amul In Andhra Pradesh Controversy: कर्नाटक, तामिळनाडू पाठोपाठ आता आंध्रप्रदेशमध्ये 'अमूल'च्या प्रवेशावरून राजकारण तापलं! 

देशाच्या दक्षिणेतील राज्यांमध्ये दूध राजकारण पुन्हा तापू लागलं आहे. गुजरात दूध संघाच्या अमूलच्या आंध्रप्रदेश प्रवेशावरून मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी विरुद्ध तेलगू देसम पार्टी (टीडीपी) मध्ये जुंपली आहे.

Team Agrowon

देशाच्या दक्षिणेतील राज्यांमध्ये दूध राजकारण पुन्हा तापू लागलं आहे. गुजरात दूध संघाच्या अमूलच्या आंध्रप्रदेश प्रवेशावरून मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी विरुद्ध तेलगू देसम पार्टी (टीडीपी) मध्ये जुंपली आहे. याआधी कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये अमूलच्या प्रवेशावरुन राजकीय गोंधळ उडाला होता. आता मात्र आंध्रप्रदेशमध्ये अमूलला टीडीपीकडून जोरदार विरोध केला जात आहे. 

आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी मंगळवारी (ता. ४) विजया डेअरीच्या म्हणजेच आंध्रप्रदेश सहकारी दूध संघाची पायाभरणी केली. विजया डेअरीच्या उभारणीसाठी गुजरात सहकारी दूध संघ (अमूल) ३८५ कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्यामुळे हा वाद पेटला आहे.

चित्तूर येथील विजया डेअरी २००२ मध्ये बंद पडली होती. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मात्र जगन मोहन रेड्डी यांनी निवडणूक प्रचारात विजया डेअरी सत्तेत येताच सुरू करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यामुळे रेड्डी यांनी विजया डेअरीच्या उभारणीसाठी अमूलची गुंतवणूक स्वीकारली आहे. मात्र यावरून टीडीपीनं मात्र मुख्यमंत्री रेड्डी यांच्यावर जोरदार टीका करत प्रादेशिक अस्मितेचा मुद्दा उपस्थित केला आहे.

टीडीपीचे नेते चंद्रबाबू नायडू यांनी तर तेलगू जनतेची अस्मिता गुजरातला विकली असल्याची टीका केली आहे. त्यामुळे वायआरएस आणि टीडीपी यांच्या वाद पेटला आहे.

टीडीपीच्या आरोपाचं खंडन करताना मुख्यमंत्री रेड्डी म्हणाले, "या सुविधा उभारण्यासाठी अमूल ३८५ कोटी रुपयांची गुंतवणूक करत आहे. अमूलच्या आउटलेट आणि वितरणद्वारे सुमारे ५ हजार प्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण होतील आणि सुमारे २ लाख लोकांना रोजगार मिळेल." 

पुढे त्यांनी चंद्रबाबू नायडूवर हल्ला करत चंद्राबाबू नायडू यांच्या सरकारच्या भ्रष्टाचारामुळं विजया डेयरी बंद पडल्याचा आरोप केला.

रेड्डी म्हणाले, "विजया डेयरीमध्ये १९८८ मध्ये दररोज २ लाख लिटर दुधावर प्रक्रिया केली जात होती. १९८९ ते १९९३ दरम्यान ते दररोज सरासरी २.५ लाख ते ३ लाख लिटरपर्यंत पोहोचलं होतं.

१९९३ मध्ये, चंद्राबाबू नायडू यांनी त्यांचा स्वतःचा डेअरी उपक्रम, हेरिटेज डेअरीची स्थापन केली. ३१ ऑगस्ट २००२ रोजी विजया डेअरी अचानक बंद पडली. शेतकरी आणि कामगारांवर शेकडो कोटींच्या थकबाकीचा बोजा पडला होता. चंद्राबाबूंनी स्थानिक दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांवर आपल्या व्यवसायाचा फायदा व्हावा म्हणून दबाव आणला."  

यावर मात्र टीडीपी राज्य युनिटचे अध्यक्ष किंजरापू अचेन नायडू यांनी मुख्यमंत्री रेड्डी केंद्रीय एजन्सीच्या दबावाला बळी पडले आहेत. न्यायालयीन प्रकरणांमुळे अमूलला आंध्रप्रदेशमध्ये प्रवेश देऊन त्यांची गुंतवणूक स्वीकारली आहे. राज्यातील स्थानिक दूध डेअरीचा विचार न करता गुजरात दूध संघाच्या अमूल आमंत्रित करण्यामागे काय रहस्य आहे?" असा प्रश्नही नायडू यांनी उपस्थित केला आहे. 

दरम्यान, वायएसआरसीपी सरकारनं अमूलशी करार करून चित्तूरची जमीन ९९ वर्षांच्या लीजवर अमूलला दिली आहे. तसेच आईस्क्रीम व्यतिरिक्त, अमूल युनिट दूध पावडर, पनीर, दही, लोणी यासह दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती या डेअरीच्या मार्फत केली जाणार आहे. तसेच या प्रकल्पात दररोज सुमारे १ लाख लिटर दुधावर प्रक्रिया करण्यात येणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Zilla Parishad elections: अहिल्यानगर ‘झेडपी’ची अंतिम प्रभाग रचना जाहीर

Crop Loan: किसान क्रेडिट कार्डचे एक हजार पीककर्ज प्रस्ताव मंजूर करा: जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Manjara Dam: ‘नॅचरल’च्या वतीने मांजरा धरणातील पाण्याचे जलपूजन

Bioenergy Award: विस्मा तर्फे ‘श्री गुरुदत्त’ला उत्कृष्ट बायोएनर्जी उत्पादक पुरस्कार

Solar Energy Project: सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार: अध्यक्ष मानसिंगराव नाईक

SCROLL FOR NEXT