Advaya Hire Agrowon
ॲग्रो विशेष

Fraud Case : शिवसेनेच्या उपनेत्याला भोपळमध्ये अटक; जिल्हा बॅंकेच्या कर्जाची परतफेड न केल्याने कारवाई

Nashik DCC Bank Loan : शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांना आज नाशिकच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भोपाळमधून अटक केली.

Swapnil Shinde

Nashik News : शिंदे सरकारमधील मंत्री दादा भुसे यांचे प्रतिस्पर्धी असलेले शिवसेना (ठाकरे) उपनेते अद्वय हिरे यांना आज नाशिक ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे पथकाने आज भोपाळमधून (मध्यप्रदेश) अटक केली.

डॉ अद्वय हिरे यांच्यावर रेणुका सुत गिरीसाठी नाशिक जिल्हा बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड न केल्याने फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांनी जामीनासाठी अर्ज केला होता, पण न्यायालयाने तो नाकारल्याने गेल्या दोन आठवड्यांपासून हिरे फरार झाले होते.

शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांनी ८ वर्षांपूर्वी रेणुका सुतगिरणीसाठी नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेतून (NDCC Bank) ७.४६ कोटीचे कर्ज घेतले होते. त्याची वेळेत परतफेड न केल्याने ही रक्कम ३२ कोटी रुपयांवर गेली होती. याप्रकरणी मालेगाव तालुक्यातील रमझानपुरा पोलीस ठाण्यात कर्जाच्या पैशांचा गैरवापर करत फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

त्यानंतर हिरे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. परंतु त्याचा जामीन नाकारण्यात आल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली. ते काही दिवसांपासून फरार होते. नाशिक ग्रामीण पोलीस त्यांचा शोध घेत होते. आज त्यांना स्थानिक गुन्हे शाखेने भोपाळमधून अटक केली. या गुन्ह्यामध्ये हिरे यांच्यासह १२ जणांविरोधात फसवणूकीचा आरोप करण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT