Agriculture Research
Agriculture Research Agrowon
ॲग्रो विशेष

Indian Agriculture : नव्या जनुकीय तंत्रज्ञानामुळे बुरशींच्या अभ्यासात होतेय प्रगती

Anil Jadhao 

Agriculture Research : बुरशी हा पृथ्वीवरील जैव संरचनेनेतील एक महत्त्वाचा भाग आहे. या अंतर्गत घटकाचा उपयोगी मानवी जीवन अधिक सुसह्य बनविण्यासाठी केला जात आहे. अर्थात, त्या अनेक वेळा आकाराने सूक्ष्म असल्यामुळे त्यातील अनेक प्रकार आजही आपल्याला अज्ञात आहेत.

या ज्ञात आणि अज्ञात बुरशींच्या जनुकांचा अभ्यास केल्यास त्यातून जैवतंत्रज्ञान शाखा अधिक सक्षम होण्यास मदत होईल, असा दावा ओहिओ राज्य विद्यापीठातील संशोधकांनी केला आहे.

त्याविषयी माहिती देताना ओहिओ राज्य विद्यापीठातील वनस्पती रोगशास्त्र विभागातील सहायक प्राध्यापक मिटचेल रॉथ यांनी सांगितले, की बुरशींच्या बाबतीत सर्वांत आश्‍चर्यकारक गोष्ट म्हणजे त्या वेगवेगळ्या पद्धती जीवनचक्रामध्ये आपली भूमिका चोख पार पाडत असतात.

त्या सर्वत्र आढळतात. जरी त्यांना पोषक वातावरण नसले तरी त्याला जुळवून घेण्याची त्यांची क्षमता वादातीत आहे. नुकतेच प्रत्यक्ष प्रक्षेत्रामध्ये आढळलेल्या अनेक बुरशी जातींना त्यांची खास ओळख मिळवून देण्यात संशोधकांना यश आले आहे.

प्रत्येक बुरशींची नेमकी ओळख जाणून घेण्यासाठी लोकप्रिय अशा ‘एचबीओ अॅडॉप्टेशन’ तंत्राची खूप मदत झाली. त्यामुळे आजवर अज्ञात असलेल्या अनेक बुरशी जैवतंत्रज्ञानामध्ये उपयोगी ठरू शकतात.

अर्थात, एकूण बुरशींच्या संख्येचा विचार केला तर आता केवळ पृष्ठभागच खरवडला गेला आहे, असे म्हणता येईल. खरेतर आमच्या संशोधन पेपरमुळे बुरशींच्या क्षेत्रामध्ये अधिक काम करण्याची आवश्यकताच पुढे आलेली आहे.

बुरशीच्या अनेक प्रजाती या वैद्यकीय क्षेत्रामध्ये नवीन औषधांच्या निर्मितीमध्ये अत्यंत महत्त्वाच्या आहेत. (उदा. पेनिसिलिन किंवा लोवास्टॅटीन.) या बुरशी अन्य सूक्ष्मजीवांच्या नियंत्रणामध्ये उपयुक्त ठरतात. काही बुरशींचा वापर अन्न किंवा पेयांच्या निर्मितीमध्ये केला जातो. हे संशोधन ‘जर्नल फ्रंटियर्स इन फंगल बायोलॉजी’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

सर्व क्षेत्रांना होईल अधिक फायदा

रॉथ हे प्रामुख्याने काही बुरशी हानिकारक का बनतात आणि रोगांचा प्रसार का करतात यावर संशोधन करत आहेत. यामध्ये अनेक बाबी अद्यापही ज्ञात नाहीत. त्यामुळे त्या क्षेत्रामध्ये डीएनए सिक्वेन्सिंग या तंत्रज्ञानातील प्रगतीचा फायदा करून घेण्यात येत आहे.

त्याविषयी बोलताना रॉथ म्हणाले, की जनुकांचा तुलनात्मक पातळीवर अभ्यास केला जात आहे. त्यातून ही जनुके नेमकी कोणत्या प्रक्रियेमध्ये भाग घेतात, हे समजू शकेल. त्यामुळे प्रयोगशाळेमध्ये अधिक चांगल्या प्रकारे कार्य करणाऱ्या बुरशी प्रजातींचा विकास करणे शक्य होईल.

डीएनएच्या सिक्वेन्सिंग तंत्रज्ञानामध्ये नॅनोपोर आणि पॅकबायो ही दोन तंत्रे अत्यंत महत्त्वाची ठरत आहेत. त्यातून अधिक मोठ्या आकाराचे डीएनए भाग तपासणे शक्य होत आहे. त्यामुळे प्रक्रियेचा वेग वाढला आहे.

सध्या एका शास्त्रज्ञाला प्रयोगशाळेमध्ये बुरशींवर काम करायचे, तर ते अधिक महागडे ठरत आहे. अशा वेळी एकापेक्षा अधिक संस्था, कंपन्या यांनी पुढाकार घेतल्यास सर्वांचाच फायदा होईल.

विशेषतः जैवतंत्रज्ञानामध्ये कार्यरत कंपन्या यातील उपयुक्त बुरशींच्या विकास आणि वाढीसाठी नक्कीच पुढे येतील. त्यातून जैवविज्ञानाची ही शाखा अत्यंत वेगाने प्रगत होईल, यात शंका नाही. कारण त्यातून त्यांचा व्यवसाय वाढणार आहे. बुरशींविषयी जितके अधिक माहिती होईल, तितका फायदा विविध क्षेत्राला होत जाईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Beed Lok Sabha : बीडमध्ये ५५ वैध उमेदवार; छाननीअंती १९ उमेदवार बाद

Water Storage : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Green Hydrogen Project : हिमाचल प्रदेशच्या झाकरीत देशातील पहिला हरित हायड्रोजन प्रकल्प

Sustainable food : कार्बन फूटप्रिंट की शाश्‍वत अन्न?

Mumbai APMC Scam : संजय पानसरे यांना न्यायालयीन कोठडी

SCROLL FOR NEXT