Dr. Vijay Mahajan Agrowon
ॲग्रो विशेष

Dr. Vijay Mahajan : कांदा उत्पादन वाढीसाठी शास्त्रोक्त पद्धतींचा अवलंब करा

Agriculture Management : किडींचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी बांधावरचे गवत काढून टाकावे, असा सल्ला कांदा व लसूण संशोधन संचनालयाचे तज्ज्ञ डॉ. विजय महाजन यांनी शेतकऱ्यांना दिला.

Team Agrowon

Narayangaon News : कांदा उत्पादन वाढीसाठी गादीवाफ्यावर रोपांची निर्मिती करावी. संतुलित खतांचा वापर करावा, उत्पादन खर्च कमी करण्याबरोबरच कांदा लागवडीसाठी मल्चिंग पेपरचा वापर करावा. किडींचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी बांधावरचे गवत काढून टाकावे, असा सल्ला कांदा व लसूण संशोधन संचनालयाचे तज्ज्ञ डॉ. विजय महाजन यांनी शेतकऱ्यांना दिला.

ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव येथे ग्लोबल कृषी जिल्हा महोत्सव २०२४ अंतर्गत आयोजित परिसंवादात डॉ. विजय महाजन यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

या वेळी डॉ. महाजन यांनी शास्त्रोक्त पद्धतीने रोपनिर्मिती, कांदा लागवड ते काढणी दरम्यानच्या मशागतीचे नियोजन शेतकऱ्यांना सांगितले. गोपीनाथ दिवेकर यांनी टोमॅटो लागवडीसाठी मल्चिंग पेपरचा वापर, विषाणूजन्य रोगांपासून वाचण्यासाठी एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब याबाबत माहिती दिली.

या वेळी चर्चासत्रात कांदा व टोमॅटो लागवडीची योग्य वेळ, रोपे लावणीची पद्धत, खत व्यवस्थापन, रोग आणि किडींचे नियंत्रण आणि काढणी आणि साठवण यांसारख्या विषयांचा समावेश होता. शेतकऱ्यांनी कांदा व टोमॅटो उत्पादनात येणाऱ्या अडचणींबाबत तज्ज्ञांशी चर्चा केली. डॉ. महाजन आणि दिवेकर यांनी यावेळी मार्गदर्शन केले. या चर्चासत्रातून शेतकऱ्यांना कांदा व टोमॅटो उत्पादन वाढीसाठी आवश्यक असलेली माहिती मिळाली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारत टेमकर यांनी केले. तर, आभार सुनील ढवले यांनी मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT