Onion Farm
Onion FarmAgrowon

Onion Production : दर्जेदार कांदा उत्पादनासाठी संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन

Onion Cultivation : कांदा पिकाच्या अन्नद्रव्य व्यवस्थापनात गंधक महत्त्वाचे आहे. पिकाची गंधकाची गरज स्फुरदाएवढी आहे. गंधकाचे कार्य नत्राच्या कार्याशी मिळते जुळते असते. यामुळे पीक पोषण चांगल्या प्रकारे होते. पिकाच्या जोमदार वाढीस चांगली चालना मिळते.
Published on

गहिनीनाथ ढवळे

Onion Management : जागतिक बाजारपेठेत भारतीय कांद्याला चांगली मागणी आहे. यासाठी प्रतवारी महत्त्वाची ठरते. क्षेत्राच्या दृष्टीने भारत जगात अग्रेसर असला तरी उत्पादकतेच्या बाबतीत बराच खाली क्रमांक लागतो.

देशातील कांदा उत्पादकता कमी असण्याची प्रमुख कारणे म्हणजे सुधारित जातींच्या बियाण्यांचा अभाव, संतुलित खत व्यवस्थापनाचा अभाव, पीक वाढीच्या महत्त्वाच्या काळात पाण्याचा तुटवडा, रोगांमुळे व किडीमुळे होणारे नुकसान, सुधारित लागवड तंत्राचा कमी वापर.

उत्पादनातील समस्या

एकसमान (अ आणि ब प्रतवारी) आकाराचे कांदे कमी तर चिंगळी कांद्याचे प्रमाण जास्त मिळते.

जोड कांदे व डेंगळा कांद्याचे प्रमाण जास्त वाढणे.

साठवणुकीत काजळी सारख्या बुरशीजन्य व कांदा सड या रोगांचा प्रादुर्भाव जास्त आढळून येतो. त्यामुळे कांदा साठवणुकीत सुद्धा कमी काळ टिकतो. साठवणुकीत २० ते ४० टक्क्यांपर्यंत नुकसान होते.

या अडचणींवर मात करण्यासाठी आणि कांद्याच्या दर्जेदार उत्पादनासाठी संतुलित पोषण व्यवस्थापन त्याच्या वाढीच्या अवस्थेनुसार करावे.

Onion Farm
Onion Cultivation : कांदा पीक जगविण्यासाठी पाणी विकत घेण्याची वेळ

संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापनाची तत्त्वे

पोषक घटकांचा योग्य स्रोत.

पोषक घटकांची योग्य मात्रा.

पोषक घटकांच्या वापराचे योग्य ठिकाण.

पोषक घटकांचा पुरवठ्यासाठी पिकाच्या वाढीचा योग्य टप्पा.

पिकाच्या असंतुलित पोषणाची परिणाम

पीकवाढीत अत्यल्प प्रतिसाद व उतरती कळा.

अत्यल्प उत्पादन व निकृष्ट गुणवत्ता.

जमिनीची सुपीकता खालावते.

कार्यक्षम अन्नद्रव्यांचा अत्यल्प वापर.

जमिनीतील सेंद्रिय कर्बाचा पीक पोषणाशी संबंध

सातत्याने जमिनीचा वापर, मशागतीसाठी अशाश्‍वत पद्धतींच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्बाचा दिवसेंदिवस अतिशय तीव्र गतीने होणारा ऱ्हास.

सेंद्रिय कर्बाच्या कमतरतेमुळे जमिनीतील सूक्ष्म जिवाणूंची प्रक्रिया मंदावते.

सेंद्रिय कर्बाच्या कमतरतेमुळे जमिनीतील अन्नघटकांची उपलब्धता व पोषण कमी होते.

असंतुलित अन्नद्रव्य पोषणामुळे पीक उत्पादनात घट येते, पिकाची गुणवत्ता खालावते.

Onion Farm
Onion Farming : वयाच्या सत्तरीत मार्गदर्शन घेत कांद्याची यशस्वी शेती

खतांचा संतुलित वापर

पहिली मात्रा

पिकासाठी पहिली खताची मात्रा (बेसल डोस) महत्त्वाची आहे. सुरुवातीच्या दिवसांमध्ये चांगली मुळी फुटणे आवश्यक असते. त्यामुळे पिकाची चांगली वाढ होते. पहिल्या खतमात्रेमध्ये मुळांच्या वाढीसाठी आवश्यक स्फुरद, नत्र, सूक्ष्म अन्नघटक इत्यादींचा समावेश असतो.

त्यामुळे मुळी चांगली फुटते. पीक पोषण चांगल्या प्रकारे होते. पिकाच्या जोमदार वाढीस चांगली चालना मिळते. पहिली खत मात्रा जमिनीत चांगली मिसळावी. लागवडीच्या वेळेस किंवा जास्तीत जास्त रोपांची लागवड झाल्यानंतर १० दिवसांपर्यंत देणे गरजेचे आहे. कारण लागवड केल्यानंतर ३० दिवसांपर्यंत रोपे रुजून त्यांची शाखीय वाढ होत असते. जोमदार आणि निरोगी वाढीसाठी माती परिक्षणानुसार खतमात्रा द्यावी.

दुसरी मात्रा

लागवडीनंतर ३० ते ४० दिवसांनी द्यावी. या अवस्थेवेळेस कंदांची निर्मिती होत असते. त्यानंतर कांद्याचे पोषण होत असते. वाढीच्या टप्प्यानुसार खतमात्रा द्यावी.

गंधकाचा वापर

कांदा पिकाच्या अन्नद्रव्य व्यवस्थापनात गंधक महत्त्वाचे आहे. पिकाची गंधकाची गरज स्फुरदाएवढी आहे. गंधकाचे कार्य नत्राच्या कार्याशी मिळते जुळते असते. गंधक हे अन्नद्रव्य म्हणून आणि बुरशीनाशक म्हणून देखील कार्य करते. पीक पोषक अन्नद्रव्यांव्यतिरिक्त गंधकाचा जमीन सुधारक म्हणूनही उपयोग होतो.

गंधकाचा अभाव असल्यास पिके इतर अन्नद्रव्यांचे देखील शोषण योग्य प्रमाणात करू शकत नाहीत. कांदा पिकास गंधक दिल्याने तिखटपणा वाढतो, वजन वाढते. चाळीमध्ये कांदा जास्त काळ टिकतो. साठवणुकीतील कांद्यावर काळी बुरशी आणि सड या रोगांचा प्रादुर्भाव होत नाही. चकाकी व वजन टिकून राहते. हे लक्षात घेऊन माती परीक्षण अहवालानुसार गंधकाची मात्रा द्यावी.

(लेखक महाधन ॲग्रीटेक लिमिटेडमध्ये महाव्यवस्थापक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com