Sugarcane Protest agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane FRP : कोल्हापूरचा फॉर्म्युला सांगली जिल्ह्यात स्वीकारा

Sugarcane Season : कोल्हापूर जिल्ह्याचा फॉर्म्युला सांगली जिल्ह्यातील कारखानदारांनी स्वीकारावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शुक्रवारी (ता. २४) पत्रकार परिषदेत केली.

Team Agrowon

Sangli News : गतवर्षीचे ३ हजारांपेक्षा जास्त मागितले आहेत. ज्यांनी ३ हजारांच्या आत दिले त्यांनी १०० तर, ३ हजारांहून अधिक दिले त्या कारखान्यांनी ५० रुपये द्यावेत. तसेच चालू हंगामात जाणाऱ्या उसाला एफआरपी अधिक शंभर रुपये द्यावेत, याबाबतचा तोडगा कोल्हापूर जिल्ह्यात निघाला आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा फॉर्म्युला सांगली जिल्ह्यातील कारखानदारांनी स्वीकारावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शुक्रवारी (ता. २४) पत्रकार परिषदेत केली.

सांगली जिल्ह्यात रविवार (ता. २६) निर्णय न झाल्यास एक वाहनही फिरू देणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.

कोल्हापूर जिल्ह्यात आंदोलन यशस्वी झाल्यानंतर सांगली जिल्ह्यातील ऊस उत्पादकांच्या प्रश्नांबाबत माजी खासदार शेट्टी यांनी भूमिका स्पष्ट केली. मागील हंगामात तुटलेल्या उसाला ज्या कारखान्यांनी ३ हजार पेक्षा कमी रक्कम दिली आहे.

त्या कारखान्यांनी टनास १०० रुपये आणि ज्यांनी ३ हजार रुपये दिले आहेत, त्यांनी किमान आणखी ५० रुपये देण्यास जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी संमती दिल्याने ऊस दराबाबत सुरू असलेली कोल्हापूर जिल्ह्यातील कोंडी फुटली. सांगली जिल्ह्यातील कारखान्यांनी हाच फॉर्म्युला स्वीकारावा.

त्याच्यापेक्षा जास्त दिले तर हरकत नाही. जिल्ह्यातील कारखानदारांची रविवारी बैठक होणार आहे. त्यात निर्णय झाला तर चांगले आहे. आता आम्ही मागे हटणार नाही. बैठकीत निर्णय न झाल्यास आंदोलनाची सुरुवात साखराळे येथील राजारामबापू कारखान्यावरून करू, त्यानंतर ‘क्रांतिअग्रणी’ आणि ‘सोनहिरा’वर मोर्चा वळवू, असा इशारा शेट्टी यांनी दिला.

रविवारी (ता. २६) तोडगा निघाला नाही तर त्यानंतर रस्त्यावर एकही वाहन फिरू देणार नाही. पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेच्या नावाखाली मध्ये येऊ नये. मुख्यमंत्र्यांच्या संमतीने हा फॉर्म्युला तयार झाला आहे. जिल्ह्यात उसाचे मुख्य उत्पादन आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांनी तोडगा काढावा, असे ते म्हणाले.

लुंग्या-सुंग्याच्या सर्टिफिकेटची गरज नाही

माझ्यावर गेल्या २० वर्षांपासून आरोप होतोय. एका हाकेवर हजारो लोक रस्त्यावर उतरतात, हेच माझे सर्टिफिकेट आहे. कुण्या लुंग्या-सुंग्याच्या सर्टिफिकेटची गरज नाही. सदाभाऊ काय म्हणतोय त्यावर उत्तर द्यायला, मी आलो नाही. माझे कार्यकर्ते त्याला उत्तर देतील. कार्यकर्ते त्याच्यापेक्षा मोठे असल्याचा टोला राजू शेट्टी यांनी लगावला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Indigenous Livestock Breeds: सोळा नव्या देशी पशुजातींना मान्यता

Agro-Service Federation's Protest: प्रस्तावित आकृतिबंधाविरोधात कृषी सेवा महासंघाचे आंदोलन

Agriculture Admission 2026: कृषी शिक्षण प्रवेशासाठी दुसऱ्या फेरीला सुरुवात

Farmer Children Protest: एकरकमी एफआरपीसाठी शेतकरी पाल्यांचे आंदोलन

Prof. Yasmin Sheikh Dies: ज्येष्ठ व्याकरणतज्ज्ञ प्रा. यास्मिन शेख यांचे निधन

SCROLL FOR NEXT