Crop Loan Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Loan : वाढीव पीककर्जाची शिफारस ; जळगावात प्रशासनाची बैठक

Agriculture Loan : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील बॅंकांच्या तांत्रिक समितीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी कर्जासाठी मोठ्या प्रमाणावर वित्तपुरवठा करण्याची शिफारस केली आहे.

Team Agrowon

Jalgaon News : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील बॅंकांच्या तांत्रिक समितीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी कर्जासाठी मोठ्या प्रमाणावर वित्तपुरवठा करण्याची शिफारस केली आहे. त्यात बाजरी, कडधान्ये, तेलबिया आणि मका पिकासाठी पंचवीस, तर ऊस, कापूस आणि केळीसाठी दहा टक्के वाढीव कर्जपुरवठ्याच्या शिफारशीचा समावेश होता.

शिफारशींची छाननी केल्यानंतर अंतिम निर्णय राज्यस्तरीय बँकर्स समितीतर्फे घेण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात २०२४-२५ या हंगामासाठी पीक कर्जदार ठरविण्यासाठी जिल्हास्तरीय तांत्रिक समितीची बैठक झाली.

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख, ‘नाबार्ड’चे जिल्हा विकास अधिकारी श्रीकांत झांबरे, लीड सेंट्रल बँकेचे व्यवस्थापक प्रणवकुमार झा, कृषिभूषण समाधान पाटील, उद्यान पंडित रवींद्र माधवराव महाजन, कृषी विज्ञान केंद्राचे व्यवस्थापक, केळी संशोधन केंद्र प्रतिनिधी, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आदी उपस्थ‍ित होते. या वेळी समितीने वाढीव कृषी वित्तपुरवठ्याची शिफारस केली.

यांत्रिकीकरणाला प्रोत्साहन देऊन उत्पादकता सुधारण्यास मदत होईल. शेत मजुरीची किंमत आपोआप वाढणार आहे. त्यामुळे गरीब कुटुंबांना दिलासा मिळेल आणि जळगावमधून गेल्या अनेक वर्षांपासून वाढणाऱ्या स्थलांतराला आळा बसेल, असेही बैठकीत सांगण्यात आले.

‘अवजार बँक’ प्रोत्साहन

शेतकरी आधीच ट्रॅक्टरसारख्या भांडवली मालमत्तेचा मालक आहे असे मानण्याऐवजी, समितीने शिफारस केली आहे, की शेतकरी भांडवली मालमत्ता भाड्याने देऊ शकेल. भाड्याच्या खर्चाची तरतूद केल्याने उद्योजकांना ‘अवजार बँक’ स्थापन करण्यास प्रोत्साहन मिळेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Donald Trump Tarrif Decision: डोनाल्ड ट्रम्पचा भारताला जोरदार झटका; सर्वाधिक ५० टक्के आयात शुल्क लावणार

PM Kisan: किसान सन्मान नव्हे, अपमान योजना; पंजाबराव पाटील

Crop Insurance: चंद्रपुरात पीकविम्याला कमी प्रतिसाद

River Linking Project: सिंचन प्रकल्पांची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध

Anjangaon Surji APMC: अंजनगावसूर्जी बाजार समिती सभापती, प्रभारी सचिवावर गुन्हा

SCROLL FOR NEXT