Rabi Crop Loan : परभणीत रब्बी पीककर्जाचे ३४.५१ टक्केच वितरण

Crop Loan Disbursement : परभणी जिल्ह्यात चालू रब्बी हंगामात विविध बँकांनी ३० हजार ८५० शेतकऱ्यांना २५७ कोटी ७ लाख रुपये (३४.५१ टक्के) पीककर्ज वितरित केले आहे.
Crop Insurance
Crop InsuranceAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : परभणी जिल्ह्यात चालू रब्बी हंगामात विविध बँकांनी ३० हजार ८५० शेतकऱ्यांना २५७ कोटी ७ लाख रुपये (३४.५१ टक्के) पीककर्ज वितरित केले आहे. आजवरच्या पीककर्ज वितरणात १३ हजार २६७ शेतकऱ्यांनी १४१ कोटी ३९ लाख रुपयांच्या पीककर्जांचे नूतनीकरण करून घेतले, तर एकूण १७ हजार ५८३ शेतकऱ्यांना ११५ कोटी ६८ लाख रुपयांचे नवीन पीककर्ज वितरित करण्यात आले.

Crop Insurance
Rabi Crop Loan : ‘रब्बी’चे पीककर्ज वितरित, अद्यापही २५ टक्क्यांवरच

जिल्ह्यातील बँकांना यंदाच्या रब्बी हंगामात ७४४ कोटी ८३ लाख रुपये पीककर्ज वितरणाचे उद्दिष्ट दिले आहे. त्यात व्यापारी बँकांना (राष्ट्रीयीकृत) एकूण ४४२ कोटी ८ लाख रुपये, जिल्हा बँकेला १६१ कोटी ९१ लाख रुपये, महाराष्ट्र ग्रामीण ग्रामीण बँकेला १०६ कोटी २१ लाख रुपये, खासगी बँकांना ५३ कोटी ६३ लाख रुपये उद्दिष्टाचा समावेश आहे.

Crop Insurance
Rabi Crop Loan : रब्बी पीक कर्ज प्रस्ताव वाढू लागले

१५ डिसेंबरपर्यंत राष्ट्रीयीकृत बँकांनी १४ हजार ९८९ शेतकऱ्यांना १६० कोटी २२ लाख रुपये (३७.९६ टक्के), जिल्हा सहकारी बँकेने १४ हजार ४७४ शेतकऱ्यांना ८२ कोटी १९ लाख रुपये (५०.७६ टक्के),

महाराष्ट्र ग्रामीण बँकेने १ हजार १७१ शेतकऱ्यांना ११ कोटी ७९ लाख रुपये (११.१० टक्के), खासगी बँकांकडून २१६ शेतकऱ्यांना २ कोटी ८७ लाख रुपयांचे पीककर्ज वितरित करण्यात आले. गतवर्षी याच तारखेपर्यंत ३६ हजार ४०० शेतकऱ्यांना २९६ कोटी ५२ लाख रुपये (४७.४६ टक्के) पीककर्ज वितरण झाले होते.

बँकनिहाय पीककर्ज वितरण स्थिती (कोटी रुपये) (ता. १५ डिसेंबरपर्यंत)

बँक उद्दिष्ट वितरण रक्कम टक्केवारी शेतकरी संख्या

भारतीय स्टेट बँक २६९.५७ १४२.८९ ५३.०१ १३६२२

महाराष्ट्र ग्रामीण बँक १०६.२१ ११.७९ ११.१० ११७१

जिल्हा सहकारी बँक १६१.९१ ८२.१९ ५०.७६ १४४७४

बँक ऑफ बडोदा ३१.०७ ३.१८ १०.२३ २७५

बँक ऑफ इंडिया ५.५९ ०.५८ १०.३८ ४७

बँक ऑफ महाराष्ट्र ३९.१४ २.२२ ५.६७ १९२

कॅनरा बँक २२.३४ ३.३७ १५.०९ २५३

सेंट्रल बँक ऑफ इंडिया ५.७१ ०० ०० ००

इंडियन बँक ११.३७ ४.७२ ४१.५१ ४२२

इंडियन ओव्हरसीज बँक ४.९० ०.६४ १.३०६ ५१

पंजाब नॅशनल बँक ५.११ ०.४६ ९.०० २२

युको बँक ११.१४ ०० ०० ००

युनियन बँक ऑफ इंडिया १६.१४ २.१६ १३.३८ १०५

अॅक्सिस बँक ५.९० ०० ०० ००

एचडीएफसी बँक १८.०१ ०० ०० ००

आयसीआयसीआय बँक १४.२४ २.६५ १८.६१ १७५

आयडीबीआय बँक १६.४८ ०.२२ १.३३ ४१

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com