Crop Loan : पीककर्जाच्या वाटपात वाढ

PDCC Bank Crop Loan : खरीप हंगाम वाया गेल्यानंतर रब्बी हंगामात शेतकऱ्यांचा पीककर्ज घेण्याकडे काही प्रमाणात कल वाढला आहे.
Crop Loan
Crop LoanAgrowon
Published on
Updated on

Pune News : खरीप हंगाम वाया गेल्यानंतर रब्बी हंगामात शेतकऱ्यांचा पीककर्ज घेण्याकडे काही प्रमाणात कल वाढला आहे. आतापर्यंत रब्बी हंगामात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (पीडीसीसी) उद्दिष्टाच्या ६३० कोटी रुपयांपैकी ४०८ कोटी १७ लाख रुपये म्हणजेच ६४ टक्के पीककर्जाचे वाटप झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी पीककर्जामध्ये ८२ कोटी ८० लाख रुपयांनी वाढ झाली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

चालू वर्षी पावसाळ्यात कमी पावसामुळे खरीप हंगाम वाया गेला. त्यातच सप्टेंबरअखेरीस झालेल्या पावसामुळे पाणी पातळीत वाढ झाली असल्याने त्यावर शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाचे नियोजन केले होते. परंतु आर्थिक अडचणी उभ्या राहिल्याने शेतकऱ्यांनी पीककर्ज घेण्याचा पर्याय स्वीकारला आहे. रब्बी हंगामात अनेक शेतकऱ्यांनी ‘पीडीसीसी’कडून विविध पिकांसाठी कर्ज घेतात.

Crop Loan
Crop Loan Subsidy : पीक कर्जाची नियमीत परतफेड करूनही कोल्हापूरवर अन्याय, पात्र शेतकरीही अनुदानापासून वंचित

यंदाही पुणे जिल्हा सहकारी बँक तालुका व महत्त्वाच्या गावपातळीवर असलेल्या जवळपास ३०० शाखांमार्फत गावपातळीवरील सुमारे १३०६ विविध कार्यकारी सहकारी सोसायटींना कर्जपुरवठा करून तो कर्जरूपाने सभासदांना देतात. सध्या बँकेकडून तीन लाखांपर्यंत कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याज दराने पीककर्जाचे वाटप केले जात आहे. तर तीन लाखांहून अधिक पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना अकरा टक्के दराने वाटप केले जात आहेत.

रब्बी पिकांव्यतिरिक्त बँकेकडून ऊस, टोमॅटो, कांदा, बटाटा, केळी, द्राक्ष, डाळिंब, आंबा, गुलाब, जरबेरा, ढोबळी मिरची, भात, भुईमूग अशा अनेक पिकांना पीककर्जाचे वाटप करत आहे. त्यामुळे दर वर्षी पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामात आंबेगाव, बारामती, भोर, दौंड, हवेली, इंदापूर, जुन्नर, शिरूर, पुरंदर या तालुक्यांत पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे.

Crop Loan
Crop Loan : तुतीसाठी एकरी तीन लाखांवर पीक कर्जाची मर्यादा करा

बँकेकडून रब्बी हंगामात हरभरा, गहू, ज्वारी, करडई अशी विविध पिकांची पेरणी शेतकरी करतात. परंतु या पिकांची पेरणी करताना लागणाऱ्या निविष्ठा खरेदीसाठी काही वेळेस शेतकऱ्यांना अडचणी येतात. त्यामुळे बहुतांशी शेतकरी पीककर्जाचा आधार घेऊन खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामांचे नियोजन करून पिके घेतात.

तालुकानिहाय रब्बीचे पीककर्ज वाटप

तालुका --- वाटप (रुपयांमध्ये)

आंबेगाव --- ७० कोटी ४१ लाख ३६ हजार

बारामती --- १९ कोटी ९९ लाख ३४ हजार

भोर --- २१ कोटी २८ लाख ४९ हजार

दौंड --- २० कोटी ४५ लाख १८ हजार

हवेली --- ९ कोटी ९ लाख १९ हजार

इंदापूर --- ४० कोटी १ लाख ५७ हजार

जुन्नर --- ७४ कोटी ६५ लाख ५९ हजार

खेड --- ६५ कोटी ४२ लाख ७६ हजार

मावळ --- १३ कोटी २० लाख ५ हजार

मुळशी --- १७ कोटी १७ लाख ६७ हजार

पुरंदर --- ३४ कोटी ८८ लाख १ हजार

शिरूर --- १६ कोटी ५३ लाख ७४ हजार

वेल्हा --- ५ कोटी ४ लाख ९८ हजार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com