Agriculture Pump  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Pump Theft : चोरी रोखण्यासाठी प्रशासन, शेतकरी येणार एकत्र

Latest Agriculture News : कृषिपंप व कृषिपंपासाठी लागणारी तांब्याची केबल चोरीला जाण्याचे प्रकार वाढले आहेत.

Team Agrowon

Pune News : तालुक्यात कृषिपंप व कृषिपंपासाठी लागणारी तांब्याची केबल चोरीला जाण्याचे प्रकार वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर ठोस उपाययोजना करण्यासाठी व नदीकिनारच्या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी उद्या (ता. १ नोव्हेंबर) येथे प्रशासन व शेतकऱ्यांची एकत्रित बैठक आयोजित करण्यात आली आहे.

येथील मुख्य प्रशासकीय कार्यालयात उद्या (ता. १ नोव्हेंबर) सकाळी ११ वाजता होणाऱ्या या बैठकीत कृषिपंप चोरी, त्याबाबत घ्यावयाची खबरदारी, प्रशासन व शेतकऱ्यांनी करावयाच्या उपाययोजना याबाबतचा कृती कार्यक्रम ठरविला जाणार आहे.

प्रांताधिकारी हरेश सुळ यांच्या अध्यक्षतेखाली व तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत गवारी, शिरूरचे पोलिस निरीक्षक संजय जगताप, रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक महेश ढवाण, शिक्रापूरचे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, गटविकास अधिकारी महेश डोके,

तालुका कृषी अधिकारी सिद्धेश ढवळे, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता एस. व्ही. जाधव, सहायक अभियंता महेश बेसुळके यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीस तालुक्यातील शेतकऱ्यांनी, प्रामुख्याने नदीकिनारच्या शेतकऱ्यांनी व ज्यांच्या मोटारी चोरीला गेलेल्या आहेत, अशा सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते नीलेश वाळूंज यांनी केले आहे.

वाळूंज यांनी काही दिवसांपूर्वी नदीकिनारच्या बाधित शेतकऱ्यांसह तहसीलदार म्हस्के यांची भेट घेऊन कृषी पंप चोरीबाबत कठोर उपाययोजनांची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

ज्याप्रमाणे शासन एक रुपयात पीकविमा देण्याचा उपक्रम राबवीत आहे. त्याप्रमाणे एक रुपयात काही वाढ करून या पीक विम्यासह विद्युत कृषिपंपांना व कृषिपंपासाठी लागणाऱ्या तांब्याच्या केबललाही विमा संरक्षण देण्यात यावे, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे.

चोरीमुळे शेतकऱ्यांपुढे अडचणी

कृषिपंप व केबलच्या सततच्या चोरीमुळे शेतकरी वर्ग त्रस्त झाला असून पिके जगविणे मुश्कील होत आहे. पिकाला जर पाणी मिळाले नाही तर पिके जगणार कशी, असा सवाल त्यांनी केला. कृषिपंप व केबल चोरी गेल्यास नवीन घेण्यासाठीचा खर्च खूप मोठा आहे. आधीच अडचणीत असलेल्या शेतकरी वर्गापुढे यामुळे आणखी समस्या निर्माण झाल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Mechanical Paddy Transplanting: चिखलगावात यांत्रिक पद्धतीने भात लागवड

Onion Tomato Report: कांदा, टोमॅटोचा अहवाल १५ ऑगस्टपर्यंत सादर करा: पाशा पटेल समितीला निर्देश

SCROLL FOR NEXT