Electricity Theft : ड्रोनद्वारे पकडली २ कोटींची वीजचोरी

Mahavitaran : मुकेश अगरवाल असे संशयिताचे नाव आहे. त्यास ‘महावितरण’ने २ कोटी ४ लाखांचा दंड ठोठावला आहे.
Electricity
ElectricityAgrowon
Published on
Updated on

Baramati News : वीजबिलाच्या थकबाकीसाठी बंद केलेल्या मीटरला बायपास करून उच्चदाबाच्या रोहित्राला थेट मोठी केबल जोडून वीजचोरी करणाऱ्या चोराचा महावितरण केडगाव विभागाने ड्रोनच्या साहाय्याने छडा लावला आहे.

मुकेश अगरवाल असे संशयिताचे नाव आहे. त्यास ‘महावितरण’ने २ कोटी ४ लाखांचा दंड ठोठावला आहे. या प्रकरणी शिक्रापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सणसवाडी (ता. शिरूर) येथे श्री. मुकेश ओमप्रकाश अगरवाल (रा. अग्रसेन सोसायटी, कोरेगाव पार्क, पुणे) यांच्या मालकीच्या तीन वेगवेगळ्या कंपन्या आहेत. तिन्ही कंपन्या एकाच आवारात व शेजारी-शेजारी आहेत.

Electricity
Electricity Theft : राज्यात तीन दिवसांत ३८३ वीजचोऱ्या उघडकीस

मे. थर्मोलाईट पॅकेजिंग इंडिया प्रा.लि या ग्राहक जोडणीचा वीजपुरवठा थकबाकीमुळे कायमस्वरूपी बंद केला होता. तर इतर दोन वीजजोडण्यांचा वीजपुरवठा देखील थकबाकीच्या कारणास्तव तात्पुरता बंदच आहे. तरीही वीजपुरवठ्यासाठी उभारलेल्या अतिउच्चदाब रोहित्रातून थेट वीजपुरवठा सुरु केल्याची माहिती केडगावचे कार्यकारी अभियंता संदीप दरवडे यांना खबऱ्यामार्फत मिळाली.

Electricity
Electricity Theft : वर्षभरात वीजचोरीची ४०८५ प्रकरणे उघड

संबंधित ग्राहकाने गेटवर बंदोबस्त लावून आत जाण्यास मज्जाव केल्याने दरवडे यांनी ही बाब मुख्य अभियंता सुनील पावडे यांच्या कानावर घातली. तेव्हा पावडे यांनी वीजचोरी उघडकीस आणण्यासाठी ड्रोनची मदत घेण्यास सांगितले.

२५ ऑगस्ट रोजी महावितरणच्या पथकाने कुरिअर पार्सल देण्याच्या निमित्ताने एका दुचाकीवरून आत प्रवेश मिळविला. पुराव्यासाठी ड्रोनद्वारे चित्रीकरण सुरु केले. तोच बाहेर बसलेल्या टीमने ओळखपत्र दाखवून आत प्रवेश केला आणि वीजचोरीचा पर्दाफाश केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com