Wheat Harvest
Wheat Harvest  Agrowon
ॲग्रो विशेष

Wheat Harvest : गहू काढणीच्या कामांची पूर्व भागात लगबग

Team Agrowon

Nashik News : यंदा जिल्ह्यात समाधानकारक पाऊस (Rain) झाला; मात्र ऑक्टोवरअखेर पाऊस असल्याने अनेक ठिकाणी वाफसा नसल्याचे गहू पेरण्या उशिराने झाल्या आहेत.

जिल्ह्याच्या पूर्व भागात दिवाळीनंतर वाफसा स्थितीनुसार येवला, नांदगाव, चांदवड तालुक्यात शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या होत्या. हे पहिल्या टप्प्यातील पीक आता सोंगणीवर आल्याने काढणी सुरू आहे;

मात्र मजूरटंचाईमुळे यांत्रिकीकरणाकडे कल असून हार्वेस्टर यंत्राने मळणी केली जात आहे; मात्र इंधन दरवाढीमुळे अधिक पैसे मोजावे लागत आहेत.

जिल्ह्यात १५ तालुक्यात गहू पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र ६७ हजार हेक्टर इतके आहे; मात्र चालूवर्षी शेतकऱ्यांनी प्रत्यक्षात ६४ हजार ९७६ हेक्टरवर पेरणी केली आहे.

२०२२ मध्ये हे क्षेत्र ५३ हजार ९७ हेक्टर इतके होते. त्यामुळे जवळपास ११ हजार हेक्टर क्षेत्रात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. कांद्याला नसलेला भाव, कांदा रोपवाटिकांचे नुकसान झाल्याने गहू पिकाकडे शेतकरी वळले आहेत.

मागील पंधरवाड्यात ढगाळ वातावरण तयार झाल्याने शेतकऱ्यांनी धास्ती घेतली; मात्र आता कडक ऊन पडत असल्याने वेळेत काढणी करून नुकसान टाळण्यासाठी हार्वेस्टर यंत्राने काढणीला शेतकरी पसंती देत आहेत; मात्र यंदा पीक चांगले असल्याने एकरी उत्पादनात वाढ दिसून येत आहे.

पशुपालक शेतकरी सोंगणी करून मळणी यंत्राद्वारे काम करत आहेत. काही शेतकरी गहू पीक काढणीनंतर उपलब्ध भुस्सा पशुपालक, वीटभट्टी उद्योग, मशरूम उत्पादक यांसह फलोत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना सेंद्रिय अच्छादनासाठी विक्री करत असतात. मात्र डिझेलच्या दरात वाढ झाल्याने प्रति एकरी ३०० ते ४०० रुपये अधिकचे मोजावे लागत आहेत.

गहू काढणीची झालेली दरवाढ अशी :

वर्ष एकरी काढणी दर (रुपये)

२०२१ - १८०० ते २०००

२०२२ - २२०० ते २४००

२०२३ - २४०० ते २५००

यंदा पेरणी केल्यानंतर ४ ते ५ पाण्यात गहू सोंगणीला आला. मागील काही वर्षांच्या तुलनेत सुरुवातीच्या टप्प्यातील पेरणीला थंडी पोषक असल्याने एकरी २ ते ३ क्विंटल उत्पादकता वाढली आहे; मात्र काढणी खर्च वाढला आहे.
अशोक कुळधर, सेवानिवृत्त कृषी अधिकारी व शेतकरी, सायगाव, ता. येवला
मजूरटंचाई असल्याने शेतकरी हार्वेस्टर यंत्राने गहू काढणीची मागणी करत आहेत; मात्र गेल्या दोन ते तीन वर्षांत डिझेलचे दर वाढल्याने काढणी खर्चही वाढलेला आहे. मागीलवर्षी तीनशे रुपयांनी हे दर वाढले होते. यंदाही तेच दर आहेत. यंत्रचालक, देखभाल व इंधन खर्च असे सर्व खर्च समोर ठेवून त्याच दरावर कामकाज करावे लागत आहे; मात्र यंदा गहू क्षेत्र वाढल्याने मागणी वाढती आहे.
सुनील बारे, हार्वेस्टर यंत्र मालक, येवला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT