Green Hydrogen Agrowon
ॲग्रो विशेष

Green Hydrogen : हरित हायड्रोजन क्षेत्रात उतरले अदानी, अंबानी

Green Hydrogen Project : देशात सध्या हरित हायड्रोजनचे वारे वाहत असून या क्षेत्रात अदानी, अंबानीसारखे मातब्बर उद्योग समूह उतरले आहेत.

मनोज कापडे

Pune News : देशात सध्या हरित हायड्रोजनचे वारे वाहत असून या क्षेत्रात अदानी, अंबानीसारखे मातब्बर उद्योग समूह उतरले आहेत. त्यामुळे हायड्रोजन निर्मिती स्वस्त करणारे तंत्रज्ञान विकसित होण्यास चालना मिळणार असल्याने साखर उद्योगाच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत.

ग्रीन हायड्रोजन निर्मिती क्षेत्रात उद्योगपती गौतम अदानी यांची ‘अदानी न्यू इंडस्ट्रीज लिमिटेड’ (एन्यूआयएल) कंपनी झपाट्याने पुढे येत आहे. २०२७ पासून गुजरातमधील प्रकल्पात हरित ऊर्जा तयार करण्याचे कंपनीने जाहीर केले आहे.

त्यासाठी दहा वर्षांत पाच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. दुसऱ्या बाजूला उद्योजक मुकेश अंबानी यांच्या ‘रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिडेट’ (आरआयएल) या कंपनीनेदेखील तमिळनाडूत हरित हायड्रोजन प्रकल्प उघडण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

रिलायन्स’ने व अशोक लेलॅंड कंपनीसोबत अवजड वाहनांमधील इंजिनमध्ये हायड्रोजन आधारित ज्वलनशील यंत्रणा विकसित केली आहे. तसेच ओलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीसोबत रिलायन्सने हायड्रोजन बसेसदेखील तयार केलेल्या आहेत. रिलायन्सने भारत बेंझसोबतदेखील करार केला आहे. हायड्रोजन तंत्रावरील वाहतूक सेवा सुरू करण्याचे या कंपन्यांनी घोषित केले आहे. साखर उद्योगाला या साऱ्या घडामोडी आश्वासक वाटत आहेत.

हरित हायड्रोजन तयार करण्यात सध्या सर्वात मोठी अडचण खर्चाची आहे. कारण, एक किलो हायड्रोजन तयार करण्यासाठी सध्या ४०० रुपयांपेक्षा जास्त आहे. उत्पादन खर्च प्रतिकिलो ८५ रुपयांच्या खाली नेण्याचे मुख्य आव्हान जगभरातील ऊर्जा निर्मिती कंपन्यांसमोर आहे. साखर कारखाने आतादेखील हरित हायड्रोजन तयार करू शकतात. मात्र, तो फायदेशीर नाही.

स्वस्त तंत्रज्ञान आले तर इथेनॉलपेक्षाही नफेशीर व्यवसाय कारखान्यांना मिळणार आहे. हे लक्षात घेत अलीकडचे झालेल्या आंतरराष्ट्रीय साखर परिषदेत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी भाष्य केले होते. ‘हरित हायड्रोजन निर्मिती स्वस्त करणारे तंत्रज्ञान शोधा’, असे श्री. पवार यांनी शास्त्रज्ञांना केलेले आव्हान कोणाच्याही लक्षात आले नाही. परंतु, भविष्यासाठी हरित हायड्रोजन हाच साखर उद्योगाला तारक ठरेल, असे आता साखर उद्योगाला वाटू लागले आहे.

साखर उद्योगासाठी हरित हायड्रोजन मुख्य उत्पन्नाचा प्रमुख मार्ग बनू शकतो. हायड्रोजन तयार करण्यासाठी पाणी किंवा मिथेन असे दोन घटक लागतात. ते साखर उद्योगाकडे आहेत. मात्र, हायड्रोजन निर्मिती खर्चीक आहे. मोठे उद्योग यात उतरल्यास पायाभूत सुविधा व तंत्रज्ञान झपाट्याने विकसित होईल. त्यामुळे जगातील कोणताही मोठा उद्योग समूह हरित हायड्रोजन क्षेत्रात आल्यास स्वागतार्ह ठरणार आहे.
- बी. बी. ठोंबरे, अध्यक्ष, वेस्ट इंडियन शुगर्स इंडस्ट्रीज (विस्मा)
हायड्रोजन तयार करण्यासाठी सध्या वापरल्या जाणाऱ्या ऊर्जेचे स्रोत पारंपरिक व प्रदूषित आहे. त्यामुळे त्याला हरित हायड्रोजन म्हणता येत नाही. मात्र, सीबीजीसारखी हरित ऊर्जा किंवा सौर ऊर्जेच्या वापरावर हायड्रोजन तयार झाल्यास तो हरित हायड्रोजन होऊ शकतो. सध्या हे तंत्र उपलब्ध आहे. परंतु, ते अतिखर्चिक असून साखर उद्योगाच्या अद्याप तरी आवाक्यात आलेले नाही.
- डॉ. एस. व्ही. पाटील, जागतिक अल्कोहोल तंत्रज्ञानाचे अभ्यासक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Chhattisgarh Urea Supply: छत्तीसगडमध्ये शेतकऱ्यांना दिलासा; केंद्राने ६० हजार मेट्रिक टन यूरिया मंजूर केला

GST Reforms India : दुग्धजन्य पदार्थांवरील GST कमी केल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा, जाणून घ्या कसा फायदा होणार?

Semiconductor Chip : आली पहिली 'मेड इन इंडिया' चिप! शेतकऱ्यांना कसा होईल फायदा?

Marathwada Flood: मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान; पंचनाम्यांना विलंब

Genome Paddy Variety : भारताने विकसित केलेल्या जगातील पहिल्या जिनोम संपादित भात वाणाची काय आहे खासियत?

SCROLL FOR NEXT