Green Hydrogen : ग्रीन हायड्रोजन तयार करण्याचा विचार व्हावा

Nitin Gadkari Speech : एनडीए चौकातील (चांदणी चौक) राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ वरील एकात्मिक पायाभूत सुविधा आणि रस्ते विकास प्रकल्प, तसेच खेड व मंचर रस्ता चौपदरीकरणाच्या लोकार्पण कार्यक्रमात शनिवारी (ता. १२) गडकरी बोलत होते.
Green Hydrogen
Green HydrogenAgrowon

Pune News : ‘‘ग्रीन हायड्रोजन हे भविष्य असून, पुणे शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया करून ग्रीन हायड्रोजन तयार करण्याचा विचार व्हावा. पुण्यातील सर्व कचऱ्याचे विलगीकरण करून पुणे चक्राकार मार्गासाठी वापरल्यास कचऱ्याची समस्या दूर होईल. अशुद्ध पाणी शुद्ध करून उद्योग, शेती आणि रेल्वेला दिल्यास जलप्रदूषण दूर होण्यास मदत होईल.

शहरातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासोबत शहरातील प्रदूषण दूर करण्यावर अधिक भर द्यावा,’’ असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी केले.

एनडीए चौकातील (चांदणी चौक) राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ वरील एकात्मिक पायाभूत सुविधा आणि रस्ते विकास प्रकल्प, तसेच खेड व मंचर रस्ता चौपदरीकरणाच्या लोकार्पण कार्यक्रमात शनिवारी (ता. १२) गडकरी बोलत होते.

Green Hydrogen
Green Hydrogen Policy : हरित हायड्रोजन धोरणास मान्यता

या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आदी उपस्थित होते.

गडकरी म्हणाले, ‘‘पुणे शहर व जिल्ह्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी ५० हजार कोटींचे पूल हे रस्ते वाहतूक आणि महामार्ग विभागातर्फे उभारण्यात येतील आणि पुणे-बंगळूर आणि पुणे ते संभाजीनगर हे दोन्ही रस्ते प्रकल्पही लवकरच पूर्ण करण्यात येतील.’’

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘‘पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यामुळे प्रवाशांच्या संख्येत वाढ होत आहे. पुणे मेट्रोने ‘पुणे वन कार्ड’द्वारे चांगली सुरुवात केली आहे. हे कार्ड ‘पीएमपीएमएल’लाही लागू होईल अशी व्यवस्था केल्यास त्याची उपयुक्तता वाढेल.

भविष्यात देशातील इतर मोठ्या शहरातही या कार्डचा उपयोग होऊ शकेल. पुण्यात एकात्मिक वाहतूक व्यवस्था निर्माण करून ५०० मीटरवर नागरिकांना विविध वाहतूक पर्याय दिल्यास ते सार्वजनिक वाहतुकीचा जास्त उपयोग करतील.’’

Green Hydrogen
Green Hydrogen : हरित हायड्रोजन : व्यवसायहितातच राष्ट्रहित

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘‘चांदणी चौकातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. केंद्र सरकारच्या सहकार्यामुळे ही समस्या दूर करण्यात यश आले. पुणे आणि पिंपरी- चिंचवड शहरातील मेट्रोच्या कामालाही गती देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. वनाज ते चांदणी चौक आणि वाघोलीपर्यंतही मेट्रो कमीत कमी कालावधीत पोहोचवायची आहे.’’

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, ‘‘एनडीए चौकातील एकात्मिक सुविधा प्रकल्प मुंबईहून बंगळूरकडे जाणाऱ्या प्रवाशांना उपयुक्त ठरण्यासोबत शहरातील वाहतूक कोंडी दूर होण्यास उपयुक्त ठरणार आहे. राज्यात १८ हजार किलोमीटर लांबीचे महामार्ग झाले आहेत,’’ असे त्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com