Fertilizer Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Season : बियाणे, खतांची अनधिकृत विक्री केल्यास कारवाई

Seed Sale : खरीप हंगाम पूर्व तयारीबाबत गुरुवारी (ता. ६) जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित केली होती.

Team Agrowon

Nanded News : जिल्ह्यात जिल्ह्यात खते, बियाणे, कीटकनाशके मुबलक प्रमाणात उपलब्ध होण्याच्या दृष्टीने कृषी विभागाने तयारी पूर्ण केली आहे. या अनुषंगाने बाजारात जर बियाणे, खते व कीटकनाशके बोगस किंवा अनधिकृत विक्री व साठा केल्याचे आढळल्यास कारवाई करण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले.

खरीप हंगाम पूर्व तयारीबाबत गुरुवारी (ता. ६) जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा कृषी अधिक्षक भाऊसाहेब बऱ्हाटे, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी विजय बेत्तीवार, तहसीलदार, गटविकास अधिकारी, मोहीम अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी पंचायत समिती, रासायनिक खत पुरवठा कंपनी प्रतिनिधी, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ, बियाणे पुरवठादार कंपनीचे प्रतिनिधी आदींची उपस्थिती होती.

सर्व कृषी केंद्रावर कृषी सहाय्यकांची नेमणूक करावी. जिल्ह्यात कुठेही बियांणाची साठेबाजी व अनधिकृत बियाणाची विक्री होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी कृषी विभागाला दिल्या. याबाबत जिल्ह्यात भरारी पथकाची नेमणूक केली आहे.

त्यांच्यामार्फत शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्यास तत्काळ कारवाई करण्याचे, निर्देश त्यांनी यावेळी दिले.तसेच शेतकऱ्यांनी एकाच प्रतीच्या वाणाचा आग्रह धरु नये. रासायनिक खतांचा वापर मर्यादित स्वरूपात करावा. तसेच सोयाबीनचे बियाणे घरगुती वापरताना त्यांची उगवण क्षमता तपासून घ्यावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

सुरवातीला जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी प्रास्ताविकात जिल्ह्यातील उपलब्ध निविष्ठा बाबत माहिती सांगितली. सर्वानी सोयाबिन पेरणीबाबत बीबीएफ तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कृषी विकास अधिकारी विजय बेत्तीवार यांनी जिल्ह्यातील उपलब्ध खतसाठा, कंपनीनिहाय कापूस बियाणांची उपलब्धता याबाबत माहिती दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

India Groundnut Export : इंडोनिशियाच्या कठोर आणि जाचक निकषांमुळे शेंगदाणा निर्यात ठप्प; निर्यातदारांची कोंडी

New Sugarcane Variety: नवे ऊस वाण 'बिस्मिल'च्या आणखी ४ राज्यांत लागवडीसाठी मंजुरी, उच्च उत्पादन, रेड रॉट प्रतिरोधक

Shaktipeeth Highway: ‘शक्तिपीठ’साठी जनतेवर नको एक लाख कोटींच्या कर्जाचा बोजा

Warehouse Receipts: वित्तपुरवठ्यासाठी वस्तूंचा तारण म्हणून वापर

Water Conservation: बारव पुनर्शोध, संवर्धनातील ‘महाराष्ट्र बारव मोहीम’

SCROLL FOR NEXT