Palghar Zilla Parishad Recruitment Agrowon
ॲग्रो विशेष

Palghar Zilla Parishad Recruitment : भरती प्रक्रियेत गैरप्रकार झाल्यास कारवाई

पालघर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामध्ये कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया सुरू आहे.

Team Agrowon

Palghar Zilla Parishad Bharti Update : पालघर जिल्हा परिषदेच्या (Palghar Zilla Parishad) आरोग्य विभागामध्ये कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरती प्रक्रियेत गैरव्यवहार सुरू असल्याची बाब समोर आलेली आहे.

उमेदवाराकडून नियुक्तीपत्र देताना व मुलाखतीदरम्यान २५ हजार रुपयांची मागणी केली जात असल्याचे निदर्शनास आले होते.

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांना ही माहिती समजल्यानंतर भरतीदरम्यान गैरव्यवहार केला असल्यास संबंधितावर त्वरित कारवाई करण्यात येईल व भरतीचा ठेका रद्द केला जाईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला.

आरोग्य विभागामध्ये ५०० कंत्राटी कर्मचाऱ्यांची पदे मंजूर झाली आहेत. ही भरती करताना ज्या उमेदवाराकडे पैशाची मागणी केली असेल, त्या उमेदवाराने निनावी पत्र किंवा फोन केला तरीदेखील संबंधित अधिकारी अथवा कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

तसेच ठेकेदाराचा ठेका रद्द केला जाईल, असे ठणकावून सांगितले. ज्या पदाधिकाऱ्यांच्या स्वीय सहायकाने अथवा कोणाही अधिकारी किंवा पदाधिकाऱ्याने अशा प्रकारची मागणी केल्यास उमेदवार निनावी पत्र किंवा फोनद्वारे कळवू शकतात, असे आवाहन जि.प. अध्यक्षांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT