Palghar News : पालघरमध्ये गारेगार ताडगोळे विक्रीसाठी दाखल

उन्हाळ्यात चटके बसू लागले की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचे पाय लस्सी, आईस्क्रीम, शीतपेय, कलिंगड, बर्फाचे गोळे, उसाच्या रसाच्या दुकानाकडे वळू लागतात.
Palghar News
Palghar NewsAgrowon
Published on
Updated on

Palghar News : उन्हाळ्यात चटके बसू लागले की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचे पाय लस्सी, आईस्क्रीम, शीतपेय, कलिंगड, बर्फाचे गोळे, उसाच्या रसाच्या दुकानाकडे वळू लागतात. त्यासोबतच ग्रामीण भागातून शहरात येऊन विकणाऱ्या गारेगार ताडगोळ्याची चवही अनेक जण चाखतात.

जिल्ह्याच्या शहरी भागात एप्रिल व मे महिन्यात ग्रामीण पट्ट्यातून आदिवासी, भंडारी, माळी आगरी समाजातील महिला व पुरुष ताडगोळे विक्रीसाठी घेऊन येतात. त्यामुळे सध्या पालघर शहरात जागोजागी ताडगोळे विक्री करणारे दिसत आहेत.

ताडाची झाडे किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणात दिसतात. बोर्डीपासून थेट दातिवरेपर्यंत ताडाची झाडे आपल्याला दृष्टीस पडतात. या झाडांपासून ताडाचे फळ काढले जाते, त्याला ताडगोळा म्हणतात.

या भागातील ताडगोळे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात विकले जातात. ताडगोळा दिसायला अगदी मऊशार असतो. त्याच्यावर पांढऱ्या रंगाचे साल असते. ताडगोळा खायला अतिशय रुचकर लागतो.

गोळ्यामध्ये असणाऱ्या पाण्याला गोड चव असल्यामुळे अनेकांचा याकडे ओढा असतो. त्यामुळे वाढत्या उन्हात हे ताडगोळे विकत घेण्यासाठी बाजारात पालघरवासीय गर्दी करत आहेत.

Palghar News
Neera Production : आरोग्यदायी नीरा निर्मिती तंत्रज्ञान

आरोग्यदायी फायदे

ताडगोळा थंड असल्यामुळे उन्हाळ्यात खाणे आरोग्याच्या दृष्टीने चांगला असतो. त्यामुळे शरीरात थंडावा निर्माण होण्यास मदत होते. उन्हाळ्याच्या दिवसांत उष्णतेचा त्रास होण्यापासून बचाव होतो.

ताडगोळ्यामध्ये खनिज, लोह, पोटॅशियम फॉस्फरस आणि ए, बी, सी या जीवनसत्त्वाचा भरपूर साठा आहे. त्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. उन्हाळ्यात जाणवणारा डीहायड्रेशन आणि उष्माघाताचा त्रास कमी होतो.

कवळा व पाकट ताडगोळा

ताडगोळ्याच्या एका फळातून तीन गर निघतात. यामध्ये कवळा व पाकट ताडगोळा असतो. ग्रामीण भागात कवळा ताडगोळा आवडीने खाल्ला जातो; मात्र मुंबई व इतर भागांत पाकट ताडगोळा लोक आवडीने खाताना दिसतात.

शहरात महिलावर्ग वाट्यावर ताडगोळ्याची विक्री करतात. एक वाटा वीस रुपयांना असतो. त्यामध्ये चार ताडगोळे असतात. ताडगोळा पक्व झाला की त्या पिकलेल्या फळाचा गर खूप गोड असतो. त्याची भाकरी किंवा पानगा तयार करतात. वडेसुद्धा करता येतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com