HTBT Seeds Agrowon
ॲग्रो विशेष

Seed Sale : ‘साथी’द्वारे बियाणे विक्री न करणाऱ्यांना नोटिसा

Kharif Crop Seed : यंदाच्या खरीप हंगामापासून प्रमाणित व सत्यतादर्शक बियाण्यांची विक्री, वितरण हे ‘साथी पोर्टल’द्वारे करणे शासनाने बंधनकारक केले आहे.

Team Agrowon

Washim News : यंदाच्या खरीप हंगामापासून प्रमाणित व सत्यतादर्शक बियाण्यांची विक्री, वितरण हे ‘साथी पोर्टल’द्वारे करणे शासनाने बंधनकारक केले आहे. शासन निर्णयानुसार, बियाणे विक्रेत्यांनी व बियाणे कंपन्यांनी विक्रीसाठी साथी पोर्टलचा वापर करणे आवश्यक आहे.

या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने वेळोवेळी प्रशिक्षण सत्रांचे आयोजन केले होते. हा नियमभंग करणाऱ्या ४३ बियाणे व १५ खत विक्रेत्यांना कारणे दाखवा नोटिसी बजावल्याने खळबळ उडाली आहे.

जिल्ह्यात कृषी विकास अधिकाऱ्यांनी तालुका व जिल्हा स्तरावर एकूण ८ प्रशिक्षण कार्यक्रम घेतले होते. तरीही काही बियाणे विक्रेत्यांनी साथी पोर्टलचा वापर न करता बियाण्यांची विक्री केल्याचे आढळून आले.

अनुदानित खते ‘एफएमएस’ प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार क्रमांकाच्या आधारे विक्री करणे बंधनकारक आहे. मात्र प्रत्यक्ष साठा व ऑनलाइन दाखविलेला साठा यामध्ये तफावत आढळल्यामुळे केंद्र शासनाकडून पुढील खत साठा मिळण्यात अडथळे निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सर्व विक्रेत्यांना २ दिवसांच्या आत खुलासा सादर करण्यास सांगण्यात आले असून खुलासा समाधानकारक न आढळल्यास संबंधितांचा परवाना निलंबित किंवा रद्द करण्याची कारवाई केली जाईल, असा इशारा कृषी विभागाने दिला आहे.

बियाणे वितरण व्यवस्थेमध्ये पारदर्शकता, बनावट/कालबाह्य बियाण्यांवर नियंत्रण, उत्पादन कंपन्या, वितरक व विक्रेत्यांमध्ये समन्वय तसेच परराज्यांतून येणाऱ्या बियाण्यांवर देखरेख हा साथी पोर्टलचा उद्देश आहे.

शासनाच्या ध्येयधोरणानुसार शेतकऱ्यांना दर्जेदार खते व बियाणे मिळण्यासाठी सर्व परवानाधारक विक्रेत्यांनी ई-पॉस प्रणाली तसेच साथी पोर्टलवरील डेटा अद्ययावत ठेवणे अत्यावश्यक असल्याचे कृषी विभागाने म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop in Crisis : विदर्भात पावसाच्या खंडामुळे पिके धोक्यात

Fishing Crisis : मत्स्यदुष्काळामुळे रोजंदारीच संकटात

Udgir APMC : उदगीर बाजार समितीचे माजी सभापती हुडेंसह दोघे अपात्रच

Farm Road : ‘महसुल’ने केले १०४ पाणंद रस्ते खुले

Kharif Crop Loss : सांगली जिल्ह्यात पाणी देऊन जगवली खरीप पिके

SCROLL FOR NEXT