डॉ. एस. एम. खुपसेRabies Awareness: रेबीज हा प्राणघातक विषाणूजन्य रोग असून, यामुळे जगभरात दरवर्षी हजारो लोक प्राण गमावतात. विशेषतः आशिया व आफ्रिकेतील ग्रामीण भागामध्ये या आजाराचे प्रमाण अधिक दिसून येतो. त्यामुळे जनजागृती, प्रतिबंधक उपाययोजना व लसीकरणाचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश ठेवून २८ सप्टेंबर हा दिवस दरवर्षी ‘जागतिक रेबीज दिवस’ म्हणून साजरा केला जातो. .कुत्रे आणि काही सस्तन प्राण्याच्या चावण्यामुळे या रोगाचे विषाणू माणसांच्या शरीरात जाऊन रेबीज हा रोग होतो. आजही भारत हा जगातील रेबीजच्या सर्वाधिक प्रकरणे सापडणाऱ्या देशांपैकी एक देश आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार, रेबीजमुळे होणाऱ्या जागतिक मृत्यूंपैकी ३६% मृत्यू भारतात होतात. अलीकडील काही वर्षांत, भारत सरकारने रेबीज नियंत्रणासाठी अनेक पावले उचलली आहेत..‘’नॅशनल ॲक्शन प्लॅन फॉर डॉग मेडिएटेड रेबीज एलिमिनेशन’’ (NAPRE) आणि ‘’ॲनिमल बर्थ कंट्रोल (ABC)’’ कार्यक्रम यासारख्या योजना सुरू केल्या असल्या तरी सामान्य लोकामध्ये जागरूकता निर्माण करण्याची आवश्यकता मोठी आहे. कारण एकदा रेबीजची लक्षणे दिसू लागल्यावर कोणताही प्रभावी उपचार उपलब्ध नाही, त्यामुळे रोगाला प्रतिबंध हाच सर्वांत महत्त्वाचा उपाय आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे..रोग वाढण्याची प्रमुख कारणेभारतात भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या ही अनेकदृष्टीने रेबीज होण्याचे कारण ठरत आहे. या भटक्या कुत्र्यांना कोणतेही लसीकरण केले जात नाही, हेही रेबीजच्या प्रसाराचे प्रमुख कारण आहे.आजही ग्रामीण किंवा शहरी भागांतही रेबीजची लक्षणे, प्रतिबंध आणि उपचारांबद्दल फारशी माहितीचा अभाव दिसून येतो.अनेक पाळीव प्राण्यांनाही वेळेवर लस दिली जातेच असे नाही..जागतिक रेबीज दिवसाचा इतिहास‘अलायन्स फॉर रेबीज कंट्रोल (ARC)’ या संस्थेने २००७ साली जागतिक रेबीज दिवसाची सुरुवात केली. लुई पाश्चर यांच्या २८ सप्टेंबर १८९५ या पुण्यतिथीच्या दिवसाची निवड करण्यात आली. पाश्चर यांचा रेबीज लस शोध हा वैद्यकीय इतिहासातील एक मैलाचा दगड ठरला. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) या उपक्रमाला पाठिंबा दिला आणि हा दिवस जगभरातील सरकारी आणि गैर-सरकारी संस्थांसाठी रेबीज नियंत्रणासाठी एकत्र येण्याचा एक महत्त्वाचा मंच बनला..Rabies Disease : रेबीज आजाराचे नियंत्रण.या दिवसाचे मुख्य उद्दिष्ट हे आहे की, रेबीज हा एक टाळता येण्याजोगा रोग आहे आणि त्याचे उच्चाटन करणे शक्य आहे. हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवणे. २०३० पर्यंत मानवामध्ये होणारे रेबीजचे मृत्यू पूर्णपणे थांबवण्याचे जागतिक ध्येय ठेवण्यात आले आहे. (झिरो बाय ३०).रेबीज प्रतिबंधक लस (Rabies Vaccine)प्राण्यांसाठी :पाळीव कुत्र्यांसाठी नियमित लसीकरण अनिवार्य आहे. हे फक्त प्राण्यांचेच नाही तर मानवाचेही रक्षण करते. भटक्या कुत्र्यांमध्ये सामूहिक लसीकरण मोहीम राबवणे हे रेबीज नियंत्रणासाठी प्रभावी साधन आहे..मानवांसाठीप्री-एक्स्पोजर प्रोफिलॅक्सिस (PrEP) : ज्या लोकांना रेबीजचा धोका जास्त असतो, अशा व्यक्तींना ही लस कुत्रा चावण्याआधी दिली जाते. उदा. पशुवैद्य, प्राणी पकडणारे कर्मचारी इ.पोस्ट-एक्स्पोजर प्रोफिलॅक्सिस (PEP) : प्राणी चावल्यावर शक्य तितक्या लवकर ही लस घेणे आवश्यक आहे. यामुळे शरीरात विषाणूचा प्रसार थांबवता येतो.चावलेल्या जखमेची काळजी : एखादा प्राणी चावल्यावर ती जखम लगेच साबण आणि वाहत्या पाण्याने १५ मिनिटे धुवावी. यामुळे विषाणूचा प्रभाव कमी होण्यास मदत होते. त्यानंतर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि लसीकरण सुरू करावे..रेबीज मुक्तीकडे एक पाऊलजागतिक रेबीज दिवसाचा मुख्य उद्देश जागरूकता निर्माण करणे हा आहे. यासाठी अनेक उपक्रम राबवले जातात.शैक्षणिक कार्यक्रम : शाळा आणि महाविद्यालयांमध्ये रेबीजविषयी माहिती देणे, लक्षणे आणि प्रतिबंधाबद्दल शिकवणे.सामूहिक लसीकरण मोहीम : शहरी आणि ग्रामीण भागांमध्ये भटक्या कुत्र्यांसाठी मोफत लसीकरण शिबिरे आयोजित करणे..प्रचार आणि प्रसिद्धी : सोशल मीडिया, टीव्ही आणि स्थानिक माध्यमांद्वारे रेबीजच्या धोक्याबद्दल आणि प्रतिबंधाबद्दल माहिती देणे.वन हेल्थ दृष्टिकोन : रेबीज हा मानव आणि प्राणी यांच्यातील एक दुवा आहे. त्यामुळे मानवी आरोग्य आणि प्राणी आरोग्य हे एकत्र काम करतात, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.रेबीज हा एक जीवघेणा रोग असला तरी, तो टाळता येऊ शकतो. भारतातील सध्याची परिस्थिती आव्हानात्मक असली तरी, सरकारच्या आणि जनतेच्या सामूहिक प्रयत्नांनी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे लसीकरणावर लक्ष केंद्रित करून आपण रेबीजला हरवू शकतो. प्रत्येकाने आपल्या पाळीव प्राण्यांचे लसीकरण करून आणि इतरांना याबद्दल माहिती देऊन या लढ्यात सक्रिय सहभाग घेणे आवश्यक आहे..Rabies Free Maharashtra: ‘माफसू’चे राज्यात ‘मिशन झीरो रेबीज डेथ’ .भारतातील कुत्र्याच्या स्थानिक जातीकुत्रा हा जगभरातील मानवाचा लोकप्रिय, विश्वासू पाळीव प्राणी आहे. त्याचा उपयोग शिकार, मेंढपाळ, सुरक्षा, शोधन (Sniffer), लष्करी कामे, मार्गदर्शक आणि सोबती किंवा साथीदार म्हणून होतो. सुमारे १५,००० वर्षांपूर्वी चीन, मध्य आशिया व मध्य पूर्वेत मानवाने लांडग्याला माणसाळवत त्याला शिकारी व सुरक्षा या हेतूंसाठी पाळायला सुरुवात केली. पुढे निवडक प्रजननातून शेकडो जाती निर्माण करण्यात आल्या. परदेशाप्रमाणे भारतात स्थानिक हवामानाशी जुळवून घेणाऱ्या टिकाऊ व कमी देखभालीच्या जाती आहेत. स्थानिक जाती व्यवस्थित लसीकरणासह पालन करणे शक्य आहे..राजापाळयममूळ : तमिळनाडूवैशिष्ट्ये : पांढरा भुरा, उंच, स्नायूयुक्त,टोकदार कान.उपयोग : डुक्कर शिकारी व पहारेकरी म्हणून उत्तम.स्वभाव : निष्ठावान, सतर्क.मुधोल हाउंडमूळ : कर्नाटक/महाराष्ट्रवैशिष्ट्ये : सडपातळ, वेगवान, लांब नाक.उपयोग : शिकारी, सुरक्षा.नोंद : भारतीय सैन्यातही प्रयोग केला जातो..चिप्पीपरईमूळ : तमिळनाडूवैशिष्ट्ये : चपळ, ताकदवान, राखाडी/तपकिरी रंग.उपयोग : शिकारी, पहारेकरी.कारवानी हाउंडमूळ : महाराष्ट्र व कर्नाटक सीमाभागवैशिष्ट्ये : धावण्यात कुशल, सडपातळ शरीर.उपयोग : शिकारी..हिमालयन शीपडॉगमूळ : हिमाचल प्रदेशवैशिष्ट्ये : लांब केस, थंडीत टिकणारा, ताकदवान.उपयोग : मेंढपाळी, थंड प्रदेशातील सुरक्षा.इंडियन स्पिट्झमूळ : भारतभरवैशिष्ट्ये : लहान, हुशार, गोंडस.उपयोग : साथीदार कुत्रा..कन्नीमूळ : दक्षिण भारतवैशिष्ट्ये : चपळ, विश्वासू, काळपट तपकिरी रंग.उपयोग : पहारेकरी.पांडिकोनमूळ : केरळवैशिष्ट्ये : लहान, खेळकर, काळा/पांढरा रंग.उपयोग : साथीदार..रेबीज संदर्भात महत्त्वाचे मुद्दे...एका दृष्टिक्षेपातमुद्दा तपशीलरोगाचे कारण रेबीज लिसावायरस (Rabies Lyssavirus) नावाचा विषाणू.प्रसार संक्रमित प्राण्याच्या (मुख्यतः कुत्रा) लाळेद्वारे (saliva) चावल्यामुळे.लक्षणे पाण्याची भीती (Hydrophobia), ताप, डोकेदुखी, आक्रमकता, पॅरालिसिस.उपचार एकदा लक्षणे दिसू लागल्यावर कोणताही प्रभावी उपचार नाही.प्रतिबंध वेळेवर लसीकरण आणि प्राणी चावल्यास त्वरित उपचार.जागतिक उद्दिष्ट ‘झिरो बाय ३०’ (२०३० पर्यंत रेबीजमुळे होणारे मानवी मृत्यू शून्य करणे).जागरूकता पाळीव प्राण्यांचे लसीकरण, भटक्या प्राण्यांपासून दूर राहणे.डॉ. एस. एम. खुपसे, ८६०५५३३३१५साहाय्यक प्राध्यापक, पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभाग,एमजीएम, नानासाहेब कदम, कृषी महाविद्यालय, गांधेली, छत्रपती संभाजीनगर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.