Electricity Meter Agrowon
ॲग्रो विशेष

Electricity Meter : ग्राहकांना वीज मीटर देण्यास टाळाटाळचा आरोप

Electricity Meter Connection Update : वर्दडी बुद्रुक गावामध्ये नागरिकांनी महावितरणकडे अर्ज करून सुद्धा त्यांना घरगुती विद्युत मीटर जोडणी मिळत नसल्याचा आरोप होत आहे.

Team Agrowon

Buldhana News : तालुक्यातील वर्दडी बुद्रुक गावामध्ये नागरिकांनी महावितरणकडे अर्ज करून सुद्धा त्यांना घरगुती विद्युत मीटर जोडणी मिळत नसल्याचा आरोप होत आहे. मागील सहा महिन्यांपासून किनगावराजा महावितरण कार्यालयात ग्राहक पाठपुरावा करीत आहेत.

वीज ग्राहकांनी सांगितले, की किनगावराजा येथील महावितरण कनिष्ठ अभियंता तसेच सिंदखेडराजा येथील उपकार्यकारी अभियंत्यांची वेळोवेळी भेट घेऊन घरगुती मीटर वीज जोडणी देण्यासाठी विनंती केली. रीतसर अर्जही केला. उपकार्यकारी अभियंता हे कनिष्ठ अभियंत्याकडे बोट दाखवतात, तर कनिष्ठ अभियंता वरिष्ठांना विचारून घेतो असल्याचे उत्तर देत आहेत.

तालुक्यातील गावांमध्ये कर्मचारी उपस्थित राहत नसल्यामुळे नागरिकांना खासगी लाईनमनकडून कामे करावी लागतात. नवीन घरगुती विद्युत मीटर जोडणी देण्याची मागणी केली आहे.

तालुक्यातील वर्दडी बुद्रुक येथील कुरुमदास भुतेकर, राधाकिसन चव्हाण, सुनील शिंदे, नामदेव नागरे, वैभव उबाळे, एकनाथ भुतेकर यांनी ऑगस्ट २०२३ मध्ये नवीन मीटर जोडणीसाठी ऑनलाइन अर्ज केले होते. सर्व

कागदपत्रांची पुर्तता करून विद्युत महामंडळ कनिष्ठ अभियंता किनगाव राजा यांच्याकडे अर्ज सादर केला होता. परंतु ग्राहकांच्या अर्जांवर विद्युत महामंडळाकडून कोणती कारवाई झाली नाही, त्यामुळे गत सहा महिन्यांपासून हे अर्ज प्रलंबित आहे.

महावितरणकडे ऑगस्ट २०२३ मध्ये नवीन मीटर जोडणीसाठी अर्ज ऑनलाइन करून कागदपत्रे जमा केली होती. परंतु अद्यापही नवीन मीटर मिळालेले नाही. वेळोवेळी महावितरणच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना माहिती दिली. आता तरी नवीन मीटर मिळावे हीच अपेक्षा.
सुनील शिंदे, ग्रामस्थ, वर्दडी बुद्रुक, ता.सिंदखेडराजा, जि. बुलडाणा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Procurement Center: खरेदी केंद्रांचा ‘बाजार’ तेजीत

Cotton Import Duty: कापसावरील आयातशुल्क कायमस्वरूपी काढा

Maharashtra Weather: थंडीची लाट कायम राहणार

Soybean Procurement: बारडमध्ये सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र सुरू

Nanded Weather: नांदेडला तापमानाचा पारा पुन्हा घसरला

SCROLL FOR NEXT