Ethanol Production agrowon
ॲग्रो विशेष

Sugar, Ethanol Production : साखर, इथेनॉल उत्पादनाच्या अचूक माहिती एपीआय प्रणाली

Ethanol Production : केंद्रीय साखर सहसचिव यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय

Team Agrowon

राजकुमार चौगुले ः ॲग्रोवन वृत्तसेवा
API system : कोल्हापूर ः साखर आणि इथेनॉल उत्पादनाबाबत अचूकता येण्यासाठी आता केंद्राच्या वतीने हायटेक पाऊले उचलली जाणार आहेत. यासाठी ॲप्लिकेशन प्रोग्रॅमिंग इंटरफेस (एपीआय) या प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. याद्वारे सर्व साखर कारखान्यांच्या इआरपी प्रणाली (कारखान्यांचे सॉप्टवेअर) नॅशनल सिंगल विंडो सिस्टीम (एनएसडब्ल्यूएस) पोर्टलशी जोडण्‍याचा निर्णय घेतला आहे. या बाबत केंद्रीय साखर सहसचिव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला.

अन्न आणि सार्वजनिक वितरण विभाग या प्रक्रियेसाठी पुढाकार घेणार आहे. साखर व इथेनॉल उत्पादनाची परिपूर्ण माहिती केंद्राला मिळावी यानुसार केंद्राला धोरण ठरविताना सुलभ व्हावे यासाठी ही सर्व माहिती एपीआयद्वारे संकलित होणार आहे. केंद्राने गेल्या वर्षापासून साखर व अन्य पदार्थांची माहिती ऑनलाइन आणण्यासाठी डिजिटल गव्हर्नन्स ही संकल्पना राबवली आहेत. विविध क्षेत्रामधील व्यवहाराची माहिती केंद्राला कळावी यासाठी ऑनलाइन पोर्टल सुरू केले आहेत. एनएसडब्ल्‍यूएस या पोर्टलवर साखर, ज्यूट पॅकिंग आदींची माहिती भरण्‍याची सक्ती केली आहे. एपीआयचा वापर झाल्यास साखर इथेनॉलसह अन्य पदार्थांच्या खरेदी विक्रीची माहिती केंद्राला ऑनलाइन विनासायास मिळू शकेल.

सध्‍या कारखान्यांची एनएसडब्ल्यूएस पोर्टलवर नोंदणी केलेली आहे. कारखाने सध्या या पोर्टलवर मासिक माहिती भरतात. कारखान्यांनी पोर्टलवर जाऊन भरलेली माहितीच केंद्राला समजते. पण येथून पुढे कारखान्यांचे सॉफ्टवेअरच एपीआयद्वारे एनएसडब्ल्युएस पोर्टलला जोडले जातील यामुळे या सॉफ्टवेअरवर असणारी माहिती केंद्राला कळू शकेल. एपीआयद्वारे मागवलेली माहिती सध्याच्या फॉरमॅटनुसार असेल.

या प्रणालीची चाचणी पूर्ण झाली असून येत्‍या काही महिन्‍यांत या प्रणालीचा वापर सुरू होईल. मानवी चुका टाळणे, अचूक माहिती मिळवणे, अनावश्यक माहिती कमी करणे आदी बाबींसाठी ही प्रणाली उपयुक्त ठरणार असल्याचे अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाच्या सूत्रांनी सांगितले. येत्या दोन महिन्यांत कारखान्यांनी ही प्रणाली समजून घेऊन यानुसार कार्यवाही करण्याच्या सूचना कारखान्यांना देण्यात आल्‍या आहेत. यानुसार वेळेत माहिती भरण्याचेही सुचित करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Baliraja Farm Road Scheme: मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी : जयकुमार गोरे

Solar Energy Projects: सांगलीत मागणीच्या ४० टक्के विजेची जिल्ह्यामध्येच निर्मिती

Healthy Village Campaign: ‘माझं गाव- आरोग्य संपन्न गाव’ अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद

Chinese Illegal Raisin: चीनच्या बेकायदा बेदाण्यामुळे शेतकरी संतप्त

Cotton Cultivation: कापूस लागवडीकडे कल, ‘एचटीबीटी’ शिरकावाची धास्ती

SCROLL FOR NEXT