Yavatmal News : अतिवृष्टी, ओला दुष्काळ, बाजारभावाचा अभाव आणि रासायनिक खते-कीटकनाशकांच्या अनियंत्रित वापरामुळे शेतीशिवाराचे आरोग्य गंभीरपणे ढासळले आहे. शेती नापिकीच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. जमिनीतील कर्ब वाढल्यास शेतीचे आरोग्य सुधारू शकेल. सेंद्रिय शेतीला शासनाचे ठोस पाठबळ आवश्यक आहे, असे विचार शेतकरी नेते मनीष जाधव यांनी व्यक्त केले. .वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठान येथे आयोजित परसबाग सेंद्रिय शेती परिसंवाद व शेतकरी सन्मान सोहळ्यात ते अध्यक्षपदावरून बोलत होते. सुरुवातीला माजी मुख्यमंत्री (कै.) वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजनकरण्यात आले. त्यानंतर उपस्थितमान्यवरांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला..सेंद्रिय शेतीस चालना देण्यासाठी कृषी विद्यापीठ प्रयत्नशील : डॉ. ढवण.श्री. जाधव म्हणाले, की सेंद्रिय शेती ही केवळ पर्याय नाही तर मानवाच्या आरोग्यासाठीची आजची गरज आहे. केंद्र आणि राज्य शासनाने समन्वयाने सेंद्रिय शेतीसाठीचे अनुदान वाढवून शाश्वत धोरण राबविले पाहिजे. व्यक्तिगत शेतकऱ्याला आर्थिक पाठबळ मिळाले तरच सेंद्रिय शेतीचे प्रमाण वाढेल. तसेच माती परीक्षणाअभावी कर्ब झपाट्याने संपत चालला आहे. उत्पादन खर्च प्रचंड वाढत असताना बाजारभाव मात्र तुटपुंजे आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक नैराश्यात सापडत आहेत, असेही ते म्हणाले. प्रत्येक तालुक्यात माती परीक्षण केंद्र सुरूकरण्याची अत्यंत गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले..Union Budget 2023 : कृषीसाठी एकीकडे डिजिटल प्लॅटफॉर्म तर दुसरीकडे सेंद्रिय शेतीस प्राधान्य.कार्यक्रमाचे उद्घाटन याडीकार पंजाबराव चव्हाण यांच्या हस्ते झाले. ते म्हणाले, की वसंतराव नाईक यांच्यासारखा दूरदृष्टी असलेला नेता आज मिळणे कठीण आहे. त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन शासनाने कृषी क्षेत्रातील समस्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. या वेळी श्रीपत राठोड, सेंद्रिय शेती प्रवर्तक सुभाष राठोड, माजी उपविभागीय पोलिस अधिकारी रामराव चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य भारत घोगरे महाराज, शंकर आडे, संतोष चव्हाण, विठ्ठल शेती मित्र आदी मान्यवर उपस्थित होते. संचालन श्रीपत राठोड, तर विजय राठोड यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती होती..छतावर ‘परसबाग’ संकल्पना राबवावीकविवर्य बाबूलाल राठोड यांनी शेतकऱ्यांच्या जगण्याचे वास्तव शब्दबद्ध करणारी प्रभावी कविता सादर केली. परिसंवादात शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीविषयी अनुभव मांडत वाढत्या आरोग्य धोक्यांचा संदर्भ देत शहरातील नागरिकांनीही टेरेसवर ‘परसबाग’ संकल्पना राबवून स्वच्छ-सेंद्रिय भाजीपाला उत्पादित करावा, असे मत मांडले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.