Ginger cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

Ginger Cultivation : सातारा जिल्ह्यात आले लागवडीस गती

Ginger Rate Update : आल्यास प्रति गाडीस (५०० किलो) दहा ते १२ हजारांवरून ६० हजार ते ६५ हजारांपर्यंत दर मिळत आहेत.

Team Agrowon

Ginger Satara News : उष्णतेत वाढ झाल्यामुळे रखडलेल्या आले लागवडीस सध्या सातारा जिल्ह्यात सध्या सुरुवात झाली आहे. आले पिकास सध्या विक्रमी दर मिळत असला, तरी बियाणे खरेदीची वेळ संपल्यामुळे जिल्ह्यात सरासरी इतकीच लागवड होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. आले पिकास ६० ते ६५ हजार प्रतिगाडी दर मिळत आहेत.

जिल्ह्याच्या पश्‍चिम भागासह दुष्काळी तालुक्‍यामधील शेतकरी आले पीक घेतात. आले पिकाच्या दरात जानेवारी महिन्याच्या सुरुवातीपासून दरात सुधारणा होण्यास प्रारंभ झाला होता.

आल्यास प्रति गाडीस (५०० किलो) दहा ते १२ हजारांवरून ६० हजार ते ६५ हजारांपर्यंत दर मिळत आहेत. मार्च, एप्रिल महिन्यांत दरात सुधारणा झाल्याने बियाण्याच्या दरात वाढ होऊन बियाण्यांचे दर प्रतिगाडी ४० हजारांपर्यंत गेले होते.

दर वाढण्याचे संकेत मिळू लागल्याने बियाण्याच्या आल्याची विक्री पूर्णपणे बंद केली होती. दर कमी-जास्त असले तरी सातारा जिल्ह्यात सरासरी २२०० ते २५०० हेक्‍टर क्षेत्रावर लागवड होत असते. यामध्ये कोरेगाव, सातारा, खटाव तालुक्‍यांत लागवड केली जाते.

जिल्ह्यात १५ मेपासून आले लागवडीस प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यात २० ते २५ टक्के क्षेत्रावर आले लागवडीचे कामे उरकले आहे. जसजशी उन्हाची तीव्रता कमी होईल तसे आले लागवडीस वेग येणार आहे.

१० जूनपर्यंत आले लागवडीची कामे अंतिम टप्प्यात येण्याची शक्‍यता आहे. दरात सुधारणा झाल्यामुळे बियाणे खरेदी कमी झाली आहे. यामुळे दर वाढले तरी क्षेत्रात वाढ होणार नसल्याचे शेतकरी सांगत आहेत.

शेतात मुक्काम

आले पिकास विक्रमी दर मिळत असल्यामुळे आले चोरून नेण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. अनेक ठिकाणी एका रात्रीत तीन ते चार गाड्या काढून नेल्या जात आहेत. सोन्याच्या भाव आलेले आले पिकांच्या शेतात शेतकऱ्यांना मुक्काम करावा लागत आहे. चोरीच्या प्रकारामुळे आले काढणीस प्राधान्य द्यावे लागत आहे.

उष्णता कमी होत असल्याने आले लागवड सुरू आहे. आतापर्यंत दोन एकर क्षेत्रावरील लागवडीची कामे उरकली आहेत. तापमान घट होईल तसतशी आले लागवडीस वेग येणार आहे.
सुभाषराव जाधव, प्रगतिशील शेतकरी, काशीळ, जि. सातारा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT