Fodder  Agrowon
ॲग्रो विशेष

Fodder Storage : हिंगोली जिल्ह्यात जनावरांसाठी मुबलक चारा

Fodder shortage : गेल्यावर्षी अत्यल्प पाऊस, खरीप हंगामात अत्यल्प उत्पन्न आदींचा परिणाम चाऱ्यावर झाला.

Team Agrowon

Hingoli News : गेल्यावर्षी अत्यल्प पाऊस, खरीप हंगामात अत्यल्प उत्पन्न आदींचा परिणाम चाऱ्यावर झाला. मात्र, पशुसंवर्धन विभागातर्फे शेतकऱ्यांना वितरित चारा बियाण्यांमुळे जिल्ह्यात कोरडा व हिरवा असा एकूण दोन लाख ३९ हजार ६५० टन चारा शिल्लक असून तो एप्रिलपर्यंत पुरू शकतो, अशी माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली.

जिल्ह्यात उत्पादित होणारा चारा, मुरघास याची कोणीही इतर जिल्ह्यात वाहतूक करू नये, असा आदेश जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी पापळकर यांनी यापूर्वीच दिला आहे. जिल्ह्यात उत्पादित होणारा चारा, मुरघास यांची इतर जिल्ह्यात वाहतूक करण्यास बंदी आणणे, जिल्ह्याबाहेरील निविदाधारकांना लिलाव देण्यात येऊ नये.

जेणेकरून जिल्ह्यात चाराटंचाई भासणार नाही, अशी जिल्हा प्रशासनाची सूचना आहे. पशुधनाची स्थिती कृषी विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्यात दोन लाख ५५ हजार २७४ मोठी जनावरे, तर ५१ हजार ५४ मोठी जनावरे आहेत.

एकूण तीन लाख सहा हजार ३२८ पशुधन आहे. त्यांना प्रतिदिन एक हजार ६८४ टन चारा लागतो. जिल्ह्यात टंचाई नाही जिल्ह्यात वनक्षेत्रापासून ३४ हजार मे टन चारा उपलब्ध झाला आहे. गवती कुरुण चराऊ क्षेत्रापासून एक लाख ३१ हजार ७६६ मे टन चारा उपलब्ध झाला आहे.

बांध क्षेत्रातून एक लाख १५ हजार मे. टन चारा उपलब्ध झाला आहे. पडीक क्षेत्र ५ हजार ११३ मे.टन, २०२२-२३ मध्ये कृषी पिकांचे दुय्यम उत्पादन दोन लाख ४१ हजार ५६० मे टन, २०२३-२४ मध्ये दोन लाख ४७ हजार १०२ मे टनअशी एकूण सात लाख ९० हजार मे टन चारा नोव्हेंबर अखेरपर्यंत उपलब्ध झाला होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agricultural Issues: शेतीप्रश्न गांभीर्याने घ्या: शरद पवार

Pune Heavy Rainfall: पुणे जिल्ह्यात पावसाचे थैमान

Ahilyanagar Heavy Rainfall: अहिल्यानगरला दुसऱ्या दिवशी अठरा मंडलांत अतिवृष्टी

Irrigation Project: सिंचन प्रकल्पांसाठी ‘नाबार्ड’कडे १५ हजार कोटींचा कर्जप्रस्ताव

Solapur Rain Damage: सोलापुरात १ लाख हेक्टरवरील पिके बाधित

SCROLL FOR NEXT