Jalgaon News : जिल्ह्यात मागील पाच ते सात दिवसांत अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे काही भागात पावसाची तूट भरून निघाली आहे. परंतु काही तालुके, महसूल मंडळांत पावसाची मोठी तूट दिसत आहे.
त्यात यावल, रावेर व अमळनेर या तालुक्यांचा समावेश आहे. रावेरात एकूण ४५ मिलिमीटर पाऊस झाला असून, पावसाची तूट सुमारे ६० टक्के एवढी आहे. यावल तालुक्यात सुमारे ४२ टक्के आणि अमळनेरात सुमारे ३५ टक्के एवढी पावसाची तूट आहे. अमळनेर तालुक्यात ६५ टक्के पाऊस जूनमध्ये झाला आहे.
जिल्हास्तरावर चांगल्या पावसाची नोंद
काही तालुक्यांत कमी तर काही महसूल मंडळे, तालुक्यांचा चांगला पाऊस जिल्ह्यात मागील काही दिवसात झाला आहे. त्यात मागील तीन-चार दिवसात जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, धरणगाव, भुसावळ, पाचोरा, पारोळा, भडगाव या भागात जोरदार पाऊस झाला.
चाळीसगाव, धरणगावातील काही मंडळांत अतिवृष्टीही झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण पाऊसमान चांगले दिसत आहे. जिल्ह्यात २७ जूनपर्यंत १११ मिलिमीटर एकूण पाऊस पडतो. या तुलनेत जिल्ह्यात २७जूनपर्यंत ११६ मिलिमीटर पाऊस झाला आहे. मागील तीन-चार दिवसांत काही तालुक्यांत ५० ते ३० मिलिमीटर पाऊस बरसला आहे. भुसावळ तालुक्यात तीन दिवसात एकूण ४९ मिलिमीटर पाऊस झाला.
पारोळा तालुक्यात ५० मिलिमीटर, बोदवडमध्ये ४३ मिलिमीटर पाऊस झाला. तसेच पाचोरा, चाळीसगाव, जळगाव व जामनेर भागात मागील दोन - तीन दिवसांत ३० मिलिमीटरपर्यंत पाऊस झाला.
पेरण्यांना गती
२१ - २२ जूनपर्यंत जिल्ह्यात पाऊसमान व पेरण्यांची गती दिसत नव्हती. पण या आठवड्यात पेरण्यांसह पाऊसही चांगला दिसत आहे. पेरण्या व पावसाची टक्केवारी वाढली आहे. पेरण्या ५१ टक्क्यांवर जिल्ह्यात झाल्या आहेत. पेरण्या सुरूच आहेत. पाचोरा, पारोळा, धरणगाव भागात पेरणीनंतरही पाऊस आल्याने पेरण्या यशस्वी झाल्या आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.