Kharif Sowing Marathwada : मराठवाड्यात ३४ लाख ५९ हजार हेक्टरवर पेरणी

Kharif Season : मराठवाड्यातील सर्वसाधारण ४९ लाख ७२ हजार ७२८ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत शुक्रवारपर्यंत (ता. २७ ) सर्व जिल्ह्यात ३४ लाख ५९ हजार ३५५ हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली आहे.
Kharif Sowing
Kharif SowingAgrowon
Published on
Updated on

Chh. Sambhajinagqar News : मराठवाड्यातील सर्वसाधारण ४९ लाख ७२ हजार ७२८ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत शुक्रवारपर्यंत (ता. २७ ) सर्व जिल्ह्यात ३४ लाख ५९ हजार ३५५ हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली आहे. हि पेरणी सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ६९.५७ टक्के इतकी आहे. पेरणी करताना शेतकऱ्यांनी १७ लाख ९४ हजार ६२४ हेक्टर क्षेत्रात सोयाबीन तर ९ लाख ५८ हजार ९७० हेक्टर क्षेत्रावर कपाशी लागवडीला प्राधान्य दिले आहे.

छत्रपती संभाजीनगर कृषी विभागातील जालना, बीड व छत्रपती संभाजीनगर या तीन जिल्ह्यात सर्व साधारण २१ लाख ४२ हजार २३ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत १५ लाख २९ हजार ७९१ हेक्टर म्हणजे सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ७१.४२ टक्के क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली आहे. यामध्ये ६ लाख ५२ हजार २५८ हक्क क्षेत्रावर कपाशी तर चार लाख ३१ हजार ५८६ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पेरणीला शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे.

Kharif Sowing
Kharif Sowing : अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये उडीद, मुगाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता

लातूर कृषी विभागातील लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली, नांदेड या पाच जिल्ह्यात सर्वसाधारण वीस लाख तीस हजार ७०४ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत १९ लाख २९ हजार ५६३ हेक्टर म्हणजे सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ६८.१७ टक्के क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली आहे. या विभागातील शेतकऱ्यांनी कपाशीच्या सर्वसाधारण ४ लाख ४४ हजार ७८७ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत तीन लाख सहा हजार ७१२ हेक्टरवर कपाशीची लागवड केली.

तर सोयाबीनच्या सर्वसाधारण १७ लाख ८६ हजार १२७ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत १३ लाख ६३ हजार ३८ हेक्टर वर सोयाबीनची पेरणी केली आहे. मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, हे जिल्हे प्रामुख्याने सोयाबीन उत्पादक तर छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, नांदेड, परभणी हे कापूस उत्पादक जिल्हे म्हणून ओळखले जातात.

Kharif Sowing
Kharif Sowing: पुणे जिल्ह्यात खरीप हंगामाच्या २७ टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण

मूग, उडीद कमीच

सर्वसाधारणपणे मृगात पाऊस झाला की मूग उदिडाची पेरणी अपेक्षित होते असे मानले जाते. प्रत्यक्षात एके काळी उडीद, मुगाचे आगर असलेल्या मराठवाड्यात उडीद मुगाचे क्षेत्र मात्र घटत असल्याची स्थिती आहे. यंदाच्या खरीप हंगामात मराठवाड्यात मुगाचे सर्वसाधारण एक लाख २२ हजार १५३ हेक्टर क्षेत्र आहे.

त्या तुलनेत प्रत्यक्षात ६०९६२ हेक्टरवरच म्हणजे सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ४९.९१ टक्केच पेरणी झाली आहे. दुसरीकडे उडदाचे क्षेत्र १ लाख ४४ हजार ४३१ हेक्टर असताना प्रत्यक्षात ८९ हजार ४८५ हेक्टरवर म्हणजे सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ६१.९६ टक्के क्षेत्रावरच उडीदाची पेरणी झाली आहे.

बीडमध्ये पाऊस कमी

मध्यंतरी पावसाने मारलेल्या दडीने मराठवाड्यातील पेरण्यांना ब्रेक लागला होता. माहितीनुसार २७ जूनपर्यंत प्रत्यक्ष पडलेल्या पावसाची टक्केवारी पाहता बीड जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत ५० टक्केच पाऊस झाला आहे. दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत १२१.३८ टक्के, जालन्यात ९५.२२ टक्के,लातूरमध्ये ६०.५४ टक्के, धाराशिवमध्ये ८४.६८ टक्के, नांदेडमध्ये ९९.६४ टक्के, परभणीत ५७.५७ टक्के तर हिंगोली जिल्ह्यात आजवरच्या सरासरी पावसाच्या तुलनेत ८६.४७ टक्के पाऊस झाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com