
Pune News: पुणे जिल्ह्यात खरीप हंगाम २०२४-२५ साठी पेरणीला चांगला वेग आला आहे. जिल्ह्यातील एकूण दोन लाख दोन हजार २,६३ हेक्टरपैकी ५५ हजार ३४६ हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच २७ टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. काही तालुक्यांमध्ये पेरणीने चांगली प्रगती दर्शवली आहे, तर काही ठिकाणी पेरणीचे प्रमाण कमी आहे.
जिल्ह्यातील १३ तालुक्यांपैकी पुरंदर, शिरूर, आणि जुन्नर या तालुक्यांमध्ये पेरणीने आघाडी घेतली आहे. पुरंदर तालुक्यात १८,५३१ हेक्टरपैकी १०,४४७ हेक्टरवर, शिरूर तालुक्यात २७,६०२ हेक्टरपैकी ११,०२२ हेक्टरवर, आणि जुन्नर तालुक्यात २५,२८६ हेक्टरपैकी ९,०४४ हेक्टरवर पेरणी झाली आहे. याशिवाय, भोर तालुक्यात १६,०२४ हेक्टरपैकी ३,०८० हेक्टरवर पेरणी झाल्या आहेत.
दुसरीकडे, मुळशी, वेल्हा, आणि हवेली या तालुक्यांमध्ये पेरणीचे प्रमाण कमी आहे. जिल्ह्यात सरासरी ६५० ते ७०० मिलिमीटर पाऊस पडतो, जो खरीप पिकांसाठी अनुकूल आहे. यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीला पावसाचे योग्य वितरण झाल्याने पुरंदर, शिरूर, आणि जुन्नरसारख्या तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे. मात्र, मुळशी आणि वेल्हा सारख्या तालुक्यांमध्ये पावसाच्या कमतरतेमुळे पेरणीला विलंब होत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.