Chana Market Agrowon
ॲग्रो विशेष

Chana Market : बुलढाण्यात सुमारे ७० टक्के हरभरा विक्री शिल्लक

बुलडाणा जिल्ह्यात ‘नाफेड’तर्फे १५ मार्चपासून हरभरा खरेदीला सुरुवात झाली. दरम्यान दोन ते तीन वेळा पाऊस झाल्याने ही खरेदी बंद राहिली.

Team Agrowon

Chana Rate : बुलडाणा जिल्ह्यात हरभरा खरेदी बंद केल्याने नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे. बाजारात हमीभावापेक्षा ५०० रुपयांची तफावत आहे. त्यामुळे शेतकरी शासकीय खरेदीवर अवलंबून आहेत. अशातच खरेदी थांबविल्याने पेच तयार झाला आहे.

अद्याप सुमारे ७० टक्के हरभरा विक्री व्हायचा शिल्लक आहे. प्रत्येक केंद्रावर नोंदणी झालेल्यांपैकी केवळ २५ टक्केच शेतकऱ्यांच्या हरभऱ्याची मोजणी झाली आहे.

शासनाने तातडीने यावर तोडगा काढत जिल्ह्याचे हरभरा खरेदीचे उद्दिष्ट वाढवावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

बुलडाणा जिल्ह्यात ‘नाफेड’तर्फे १५ मार्चपासून हरभरा खरेदीला सुरुवात झाली. दरम्यान दोन ते तीन वेळा पाऊस झाल्याने ही खरेदी बंद राहिली.

त्यानंतर आता ९ एप्रिलपासून ‘नाफेड’ने जिल्ह्याची खरेदी स्वतःहून थांबविली. जिल्ह्याला दिलेले सुमारे साडे सहा लाख क्विंटल खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने ही खरेदी बंद करण्यात आली.

अनेकांना हरभरा विक्रीला आणण्याचे संदेश यंत्रणांकडून देण्यात आले. अशातच ही खरेदी प्रक्रिया बंद केल्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

थोडक्यात महत्त्वाचे...

- बुलडाणा जिल्ह्याचे हरभरा खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

- जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडून १३ केंद्रांवर सुमारे १ लाख ८० हजार क्विंटल खरेदी

- फेडरेशनकडे सुमारे ३१ हजारांवर शेतकऱ्यांची नोंदणी

- अद्याप २० हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांचा हरभरा मोजून घेणे शिल्लक

- अशाच प्रकारची अवस्था विविध खरेदीदार एजन्सींची

- कुठल्याही एजन्सीकडे नोंदणी झालेला हरभरा पूर्णपणे खरेदी झालेला नाही.

- तीन दिवसांपासून शेतकऱ्यांना केंद्रे सुरु होण्याची प्रतीक्षा

१४ एकरांत हरभरा पेरणी केली. त्याच्या विक्रीसाठी नोंदणी केली, तेव्हा २०० अर्ज आले होते. त्यानंतर १५ दिवसांनी पुन्हा चेक केले तर माझा नंबर १३७६ वा देण्यात आला. नोंदणीच्या प्रक्रियेत सावळागोंधळ आहे. सरकारने ऑनलाइन नोंद केलेले व ज्यांचा हरभरा खरेदी झालेला नाही, अशा शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल हजार रुपये अनुदान द्यावे.
निंबाजी लखाडे-पाटील, महासचिव,राष्ट्रीय किसान संस्था, रा. खुदनापूर, जि. बुलडाणा
सरकार नाफेड खरेदीची घोषणा करते व खरेदीच्या वेळी बारदाना नाही म्हणून पंधरा दिवस खरेदी बंद ठेवते. खुल्या बाजारात हवा तितका बारदाना मिळतो. केवळ घोषणा करायची आणि हरभरा खरेदी करायचा नाही, हे एक षडयंत्र आहे.
रमेश निकस, शेतकरी, जानेफळ, जि. बुलडाणा
मागील वर्षी नंबरमध्ये ट्रॅक्टर लावला होता. तेव्हा बंदचे आदेश आल्याने माल परता आणावा लागला. यंदाही तीच परिस्थिती उद्भवली आहे. १० ते १५ दिवसांसाठी खरेदी सुरु केल्यापेक्षा खरेदी केंद्र चालू न केलेले बरे.
प्रभाकर खुरद, शेतकरी, भोसा, जि. बुलडाणा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांवर सरकारची कारवाई; अनुदानाची वसुली, तुरुंगवासाचीही शक्यता?

Skill Training Centre: मराठवाड्यात सुरू होणार अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्र

Bio Tech Farming : ‘के. बी. बायो’च्या वनस्पतिजन्य पीक संरक्षण तंत्रज्ञानाला मान्यता

Land Records Update: जमीन मालकी कायद्याची सिंधुदुर्गातून अंमलबजावणी

Khandesh Rain Update: खानदेशात पावसाची विश्रांती

SCROLL FOR NEXT