Agriculture Electricity Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Electricity Supply : शेतीपंपांवरील भारनियमन रद्द करा

Electricity Shortage : राज्यातील वीजटंचाईचे कारण पुढे करीत महावितरण कंपनीने अचानकपणे केवळ शेतीपंपावर सुरू केलेले भारनियमन त्वरित रद्द करावे.

Team Agrowon

Kolhapur News : राज्यातील वीजटंचाईचे कारण पुढे करीत महावितरण कंपनीने अचानकपणे केवळ शेतीपंपावर सुरू केलेले भारनियमन त्वरित रद्द करावे, अन्यथा महावितरणच्या कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील सर्व कार्यालयांना ‘टाळे ठोको’ आंदोलन करू, असा इशारा इरिगेशन फेडरेशनने निवेदनाद्वारे दिला आहे.

महावितरणचे अधीक्षक अभियंता अंकुर कावळे यांना वीज अभ्यासक प्रताप होगाडे, इरिगेशन फेडरेशनचे संपर्क प्रमुख विक्रांत पाटील-किणीकर यांच्या शिष्‍टमंडळाने हे निवेदन दिले.

निवेदनानुसार, गेल्या काही दिवसांत राज्यभरात विजेची मागणी वाढली आहे. त्यामुळे विजेची टंचाई होत आहे. अशा स्थितीत महावितरण कंपनीने अचानकपणे सहकारी पाणी पुरवठा संस्था, कृषिपंपधारक शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना भारनियमन सुरू केले आहे.

सध्या उन्हाची तीव्रता वाढत आहे. त्यामुळे शेतीसाठी वेळेवर पाणी देणे गरजेचे असताना महावितरण कृषिपंपासाठी वरचेवर वीजपुरवठा खंडित करीत आहे.

उपसा कालावधीत वीजपुरवठा खंडित केला, तर त्याच दिवशी जेवढा वेळ वीज जाईल तेवढा कालावधी वीजपुरवठा वाढवून देणे गरजेचे आहे, मात्र तसे घडत नाही. उन्हाचा तडाखा वाढत असल्याच्या काळात कृषिपंपांना किमान १२ तास वीज मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. त्यात उलट महावितरणकडून भारनियमन होत आहे.

शिष्‍टमंडळात सुभाष शहापुरे, आर. के. पाटील, चंद्रकांत पाटील, एस. ए. कुलकर्णी, सचिन जमदाडे, जावेद मोमीन, गुणाजी जाधव, किरण पाटील, दादासो पाटील, महादेव सुतार, वाडकर आबा, आत्माराम पाटील व मारुती पाटील यांचा समावेश होता.

बिल वसुली अधिक, तरीही भारनियमन

विद्युत नियामक आयोगाच्या आदेशानुसार वीजबिल वसुलीप्रमाणे त्या त्या प्रमाणात भारनियमन करणे बंधनकारक आहे. कोल्हापूर व सांगली जिल्ह्याची वीजबिलाची वसुली राज्यात सर्वांत अधिक आहे. तरीही येथे भारनियमन होत आहे, ही बाब गंभीर आहे. वीजटंचाईचे संकट आहे, ही बाब मान्य आहे.

मात्र त्यासाठी केवळ शेतकऱ्यांना वेठीस न धरता सर्व घटकांवर समान भारनियमन करावे. त्यासाठी महावितरण कंपनीने समाधानकारक तोडगा काढावा, अशी फेडरेशनची मागणी आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Unseasonal Rain : सहा महिने झाले, तरी पाऊस सुरूच

Onion Market : तीन दिवसांत बाजार समितीत ५७३ ट्रक कांदा

Paddy Crop Damage : आठ दिवसांत १९६ हेक्टर भातपिकाचे पावसाने नुकसान

Jaggery Industry: सरकारचा गुळ उद्योगांवर लगाम! नवीन कायद्यानुसार नोंदणी अनिवार्य, ऊस खरेदी-विक्रीचे नवे नियम

India Rice Exports: भारतीय तांदळाला जगभरातून मोठी मागणी, यंदा १० टक्के निर्यात वाढणार

SCROLL FOR NEXT