Sugar Commissioner Agrowon
ॲग्रो विशेष

Sugar Commissioner : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पंधरवाडा व्याज द्या, अन्यथा साखर आयुक्त कार्यालयाला टाळे ठोकू : अभिजीत पोटे

Amount of FRP : अहमदनगर जिल्ह्यातील ९९ टक्के कारखान्यांनी एफआरपीची रक्कम दिल्याची माहिती खोटी असून कारखानदार खोटे बोलत आहेत.

Aslam Abdul Shanedivan

Punyashlok Ahilya Devi Nagar News : जिल्ह्यातील ९९ टक्के कारखान्यांनी एफआरपीची रक्कम दिल्याची माहिती शेतकऱ्यांना दिली जात आहे. जी खोटी असून पंधरवड्याच्या आत शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कमेवरील व्याज देण्यात यावे. अन्यथा सोळाव्या दिवशी साखर आयुक्त कार्यालयाला टाळे ठोकू, असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर (अहमदनगर) जिल्हाप्रमुख अभिजीत पोटे यांनी दिला आहे. पोटे यांनी राज्याचे साखर आयुक्त कुणाल खेमनार यांची बुधवारी (ता. १०) साखर संकुल शिवाजीनगर पुणे येथे जाऊन प्रत्यक्ष भेट घेतली यावेळी त्यांनी हा इशारा दिला.

या भेटीदरम्यान पोटे यांनी नगर जिल्ह्यातील कारखान्यांचे पितळ उघडे पाडले. शासनाच्या कायद्यानुसार शेतकऱ्यांना पंधरवाडा ऊस बिलावरील व्याज देणे बंधनकारक आहे. मात्र जिल्ह्यातील एकाही कारखान्याने अद्याप कुठलीही कार्यवाही केली नाही. ऊस बिलावरील व्याज दिलेले नाही. असे असतानाही प्रशासन म्हणून साखर आयुक्तांनी देखील कारवाई का केली नाही असा सवाल पोटे यांनी केला आहे.

त्यावरून खेमणार यांनी प्रहार जनशक्ती पक्षाच्या केलेल्या पाठपुराव्यावरून नगर जिल्ह्यातील पाच साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई केली जात असल्याचे सांगितले. तर या कारखान्यांवर आरआरसी कारवाई करण्यासाठी नगर जिल्हा अधिकारी यांना तातडीचा प्रस्ताव पाठवल्याची माहिती खेमणार यांनी दिली.

यावेळी नगर जिल्ह्यातील ९९ टक्के साखर कारखान्यांनी नियमानुसार एफआरपी दिलेली नाही. मात्र ती दिल्याचे खोटं कारखाने सांगत आहेत. तर एफआरपीवरील पंधरवाडा कायद्यानुसार व्याज ही दिलेले नाही. तर कारखान्याला ऊस घालणाऱ्या शेतकऱ्याने देखील व्याज नको असे म्हटलेले नाही. त्याचे करारनामा देखील नसल्याचे पोटे यांनी म्हटले.

यावरून खेमणार यांनी अकाउंट विभागाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेत जिल्ह्यातील ९९ टक्के कारखानदार आणि शेतकरी यांच्यात एफआरपी रक्कमेबाबत करारनामा झाल्याचे सांगितले. यावरून पोटे यांनी असे कोणतेही करारनामा झाले नसून आपल्याकडे असणारे करारनामा खोटे असल्याचा दावा केला. तर जे खोटे करारनामा कारखान्यांनी साखर आयुक्तांकडे पाठवले त्यांच्यावर गंभीर स्वरूपाची कारवाई करण्यात यावी. तर कार्यालयाकडील करारनामा च्या प्रति आपल्याला मिळाव्यात अशी मागणी पोटे यांनी खेमणार यांच्याकडे केली आहे.

तसेच शेतकऱ्यांना थकीत रकमेवरील पंधरवडा ऊस दर नियम कायद्यानुसार व्याज मिळाले नाही. तर व्याज न देणाऱ्या कारखान्यांना पुढील गळीत हंगामाचा परवाना देऊ नये अशी मागणी पोटे यांनी खेमणार यांच्याकडे केली. तसेच जर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे व्याज दिले नाही, तर साखर आयुक्तालयाला टाळे ठोक आंदोलन करू असा निर्वाणीचा इशारा, अभिजीत पोटे यांनी दिला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing 2025: देशात खरीप पेरणीला वेग; कापूस, सोयाबीन, तूर पिछाडीवर

ZP School Admission : झेडपी शाळेत प्रवेश घेतल्यास होणार कर माफ

Free Sand Policy : घरकुल लाभार्थ्यांना चार टक्केच वाळूचा पुरवठा

Crab Farming : बंदीस्त खेकडा पालन करण्यासाठी प्रोत्साहन

Livestock Support: पशुपालकांना आता मिळणार शेतीसारख्या सवलती; ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना

SCROLL FOR NEXT