abdul sattar agrowon
ॲग्रो विशेष

Abdul Sattar : छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदी अब्दुल सत्तार 

Guardian Minister Chhatrapati Sambhajinagar : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते संदीपान भुमरे यांनी आमदारकीसह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे.

Aslam Abdul Shanedivan

Chhatrapati Sambhajinagar News : संदीपान भुमरे खासदार झाल्यामुळे आपल्या आमदारकीसह मंत्रिपदाचा राजीनामा दिला. यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे राज्याचे लक्ष लागले होते. तर शिंदे गटातच रस्सीखेच पाहायला मिळत होती. यादरम्यान पुन्हा एकदा संजय शिरसाट यांना नशिबाने हुलकावणी दिली असून अब्दुल सत्तार यांच्या गळ्यात पालकमंत्री पदाची माळ पडली आहे. सत्तार यांच्याकडे हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्रिपद देखील आहे. 

भुमरे यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजप आणि शिंदे गटात रस्सीखेच सुरु झाली होती. मात्र आगामी विधानसभा निवडणुका पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तार यांच्याकडे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवली आहे. यामुळे ते जिल्ह्याचे पहिले अल्पसंख्याक पालकमंत्री ठरले आहेत. यादरम्यान आमदार संजय सिरसाट यांना पालकमंत्री केले जाईल अशा चर्चा सुरू होत्या. मात्र सत्तार यांच्या वर्णीने सिरसाट यांचे मंत्रीपदाचे स्वप्न धुळीस मिळालं आहे.

सत्तार यांची पालकमंत्री पदी वर्णी लागताच सिल्लोड मतदार संघात जोरदार जल्लोष कार्यकर्त्यांकडून करण्यात आला असून आनंदोत्सव करण्यात आला आहे. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या विश्वास दाखवत जिल्ह्याची जबाबदारी दिली आहे. पालकमंत्री म्हणून अल्पसंख्यांक समाजाला पहिल्यांदाच अशी संधी मिळाल्याचे सत्तार म्हणाले. 

तर शिंदे यांनी याबाबत निर्णय घेताना भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांनी सर्वांना विश्वासात घेऊनच माझ्या नावाची घोषणा केली. मला पालकमंत्री पदाची जबाबदारी दिली. त्यामुळे आता जिल्ह्यातील सर्वांना विश्वासात घेऊन पुढे जाणार असल्याचे सत्तार यांनी सांगितले. 

तसेच पालकमंत्री नियुक्तीबाबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील मुख्यमंत्री शिंदे यांना पत्र लिहले होते. तसेच जिल्ह्याच्या अखर्चित निधीचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर आता हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मी दानवे यांच्यासह विरोधी पक्षातील आमदारांचा आभार मानतो. आता शेवटी ओव्हर टाकण्याची संधी मला मिळाली आहे. तीन महिन्यानंतर राज्यात निवडणुका होणार आहेत. यामुळे तीन महिन्यांचं हे पालकमंत्री पद आहे. पण या कालावधीत जे शक्य असेल ते कार्यकर्ता म्हणून काम करण्याचा प्रयत्न करू असेही अब्दुल सत्तार म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT