Jayakwadi Water Issue  Agrowon
ॲग्रो विशेष

Jayakwadi Dam Water Issue : जायकवाडीच्या पाण्यासाठी ‘आप’चा ‘गंगापूर’वर ठिय्या

Jayakwadi Water Crisis : जायकवाडी धरणात पाणी सोडावे, या मागणीसाठी मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर व परभणी जिल्ह्यातील आम आदमी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सोमवारी(ता. २०) गंगापूर धरणावर धडकले.

मुकूंद पिंगळे

Nashik News : जायकवाडी धरणात पाणी सोडावे, या मागणीसाठी मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर व परभणी जिल्ह्यातील आम आदमी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सोमवारी(ता. २०) गंगापूर धरणावर धडकले. या वेळी त्यांनी धरण परिसराच्या प्रतिबंधित क्षेत्रात ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे त्यांना नोटिसा बजावण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

नाशिक जिल्ह्यातील शेतकरी विविध संघटना व राजकीय पक्ष जायकवाडीत पाणी सोडण्याविरोधात आक्रमक झाले आहेत. जायकवाडीत नाशिक जिल्ह्यातील दारणा आणि गोदावरी धरण समूहातून पाणी सोडण्यासाठी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाने आदेश दिले आहेत. मात्र त्यास नाशिक व नगर जिल्ह्यातून विरोध होत आहे.

याप्रश्नी उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल आहेत. त्यामुळे हा विषय न्यायप्रविष्ट असल्याने पाणी सोडण्यात आलेले नाही. त्यामुळे आदेशाचे पालन होत नसल्याची भूमिका घेत मराठवाड्यातील आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या देत गंगापूर धरणावर राज्य शासनाचा निषेध करत घोषणाबाजी केली.

गंगापूर धरणाचा परिसर प्रतिबंधित असल्याने येथे ठिय्या दिल्यानंतर प्रकरण चिघळण्याची शक्यता निर्माण झाली होती. या वेळी नाशिक पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांनी पोलिस यंत्रणेला माहिती दिली. त्यानंतर आंदोलकांनी नरमाईची भूमिका घेत त्यांना निवेदन दिले.

आंदोलकांशी चर्चा करत न्यायालयाच्या निर्देशानुसार पुढील कार्यवाहीचे आश्वासन शहाणे यांनी दिले. या वेळी परभणीचे आप जिल्हा समन्वयक सतीश चकोर, सोपान बोबडे, पांडुरंग बोबडे, प्रल्हाद वैद्य, शोभा गायकवाड, संभाजीनगर येथील अभिषेक पंडित, साईनाथ साळवे आदी उपस्थित होते.

गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाने दिलेल्या आदेशाविरोधात उच्च व सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. त्यावर सुनावणी होणार आहे. ही बाब न्यायप्रविष्ट असल्याने पाणी सोडण्यात आलेले नाही. न्यायालयाच्या निर्देशानुसार पुढील कार्यवाही केली जाईल.
- सोनल शहाणे, कार्यकारी अभियंता, नाशिक पाटबंधारे विभाग.
३० ऑक्टोबरपर्यंत पाणी सोडण्याचे आदेश दिले होते. तरीही त्यानुसार कार्यवाही झाली नाही. पाणी सोडण्यास अडचण काय ?त्यामुळे आम्ही दरवाजे उघडू, अशी भूमिका आमची होती.
- सतीश चकोर, जिल्हा समन्वयक, आम आदमी पक्ष, परभणी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT