Jaykwadi Water Issue : जायकवाडीत त्वरित पाणी नाही सोडल्यास उग्र आंदोलन

Marathawada Water Issue : मराठवाड्यात या वर्षी दुष्काळ आहे. पिण्यासाठी शेती व उद्योगाकरिता पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे.
Jaykwadi Water Issue
Jaykwadi Water Issue Agrowon
Published on
Updated on

Chhatrapatri Sambhajinagar News : जायकवाडीत त्वरित पाणी न सोडल्यास मराठवाडा पाणी परिषदेतर्फे एक हजार ग्रामपंचायतीच्या ठरावासह व्यापक व उग्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मराठवाडा पाणी परिषदेचे अध्यक्ष नरहरी शिवपुरे यांनी दिला.

मराठवाड्यातील जनतेच्या वतीने मराठवाडा पाणी परिषदेतर्फे मराठवाड्याच्या न्याय हक्काच्या पाण्यासाठी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ छत्रपती संभाजीनगर कार्यालयावर शुक्रवारी (ता. १७) आयोजित तीव्र निदर्शने आंदोलनात जनसमुदायासमोर बोलत होते.

Jaykwadi Water Issue
Jaykwadi Water Issue : जायकवाडीच्या पाण्यासाठी किसान सभेचे उद्या सत्याग्रह आंदोलन

श्री. शिवपुरे म्हणाले, की मराठवाड्यात या वर्षी दुष्काळ आहे. पिण्यासाठी शेती व उद्योगाकरिता पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे. समन्यायी पाणीवाटपाच्या अनुषंगाने कायदे, नियम, आदेश हे सर्व मराठवाड्याच्या बाजूने असताना हे सरकार पाणी का सोडत नाही असा प्रश्‍न मराठवाड्यातील जनतेला पडला आहे.

Jaykwadi Water Issue
Jaykwadi Water Issue : जायकवाडीसाठी पाणी सुटणार केव्हा?

हे सरकार नगर नाशिकच्या राजकीय पुढाऱ्यांच्या दबावाला बळी पडत आहे का? आणखीन शेतकरी आत्महत्येची वाट पाहतेय का? मराठवाड्यातील जनतेला गृहीत धरतंय का? किंवा मराठा आरक्षणासारखे दुसऱ्या आंदोलनाची वाट बघतंय का? असे असल्यास आम्ही याचा तीव्र निषेध करतो.

जेवढे हे सरकार मराठवाड्यातील जनतेला पाण्यापासून वंचित ठेवेल तेवढे या सरकारला जबर राजकीय किंमत मोजावी लागेल, असा इशारा श्री. शिवपुरे यांनी दिला.

या वेळी आंदोलनात जलतज्ज्ञ डॉ. शंकरराव नागरे, डॉ. सर्जेराव ठोंबरे, डॉ. जयसिंग हिरे, पाणी परिषदेचे उपाध्यक्ष मनोहर सरोदे, माजी मंत्री अनिल पटेल, माजी आमदार डॉ. कल्याण काळे, माजी आमदार भाऊराव थोरात, यांनी मनोगत व्यक्त केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com