Sharad Pawar  Agrowon
ॲग्रो विशेष

Sharad Pawar : शरद पवार गटाचं ठरलं ! निवडणूक आयोगासमोर जाण्याचा मास्टर प्लॅन

Swapnil Shinde

NCP Crisis : राष्ट्रवादीतील अजित पवार यांच्या बंडानंतर पक्ष आणि चिन्ह कुणाचं याबाबत उद्या दि. ६ ऑक्टोबरला निवडणूक आयोगात पहिली सुनावणी घेण्यात येणार आहे. आज शरद पवार गटाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची दिल्लीत बोलवण्यात आली होती. यावेळी राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य व २४ राज्यांचे प्रदेशाध्यक्ष उपस्थित होते. सर्व प्रदेशाध्यक्षांकडून शरद पवार यांचं नेतृत्व मान्य असल्याचे प्रतिज्ञापत्र भरुन घेण्यात आले. ते निवडणूक आयोगाला सादर करण्याची शक्यता आहे. बैठकीमध्ये आगामी काळात नेमके कोणते पाऊल उचलायचे? यावर चर्चा झाली.

शरद पवार गटाच्या राष्ट्रीय कार्यकारणी बैठकीला दिल्लीत सुरुवात झाली आहे. या बैठकीला सर्व राष्ट्रीय सरचिटणीस आणि राज्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वत: पक्ष संघटनेचा आढावा घेतला. त्यानंतर प्रत्येक राज्यातील राजकीय वातावरण, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची तयारी आदी मुद्द्यांवर शरद पवार यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच इंडिया आघाडीला बळ देण्यासाठी कार्यकर्त्यांनी काय केलं पाहिजे, याबाबतचं मार्गदर्शनही केले.

यावेळी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना शरद पवार यांनी सांगितले की, जे लोक गेले. ते सांगतायत अध्यक्ष पदाची निवड चुकीची आहे. पक्ष आणि चिन्ह आम्हाला मिळेल. पण जेव्हा ते मला भेटायलाय आले तेव्हा त्यांनी सांगितले. 'आमच्या विरोधात ईडीची कारवाई होतेय. यातून काही मार्ग काढा. तुम्ही आला नाहीत तर ईडी येईल, असा गौप्यस्फोट पवारांनी केला.

शरद पवार म्हणाले, गोव्यात भाजप नव्हती, मध्यप्रदेशमध्ये नव्हती. त्याठिकाणी निवडून आलेल्या लोकांना फोडून सरकार बनवले. आज केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, दिल्ली, पंजाब, ओडीसामध्ये भाजपची सत्ता नाही. निवडणूकीत चिन्ह महत्वाचं नसते. मी अनेक वेळा वेगवेगळ्या चिन्हावर निवडणुका लढवलो आणि जिंकलो. आयोगाचा निर्णय निकाल काही असो, चिंतेचं कारण नाही. सध्या देशातील वातावरण बदलत आहे. आपण सगळ्यांनी एकत्रित काम केलं पाहिजे.

निवडणूक आयोगात सुरू असलेल्या वादावर उद्या दुपारी 3 वाजता निवडणूक आयोगासमोर सुनावणी होणार आहे. शरद पवार गटाकडून सुमारे ८ ते ९ हजार शपथपत्र दाखल करण्यात आली आहेत. या सुनावणीसाठी नेत्यांना उपस्थित राहण्याची गरज नसल्याने शरद पवार गटाकडून वकिल अभिषेक मनु सिंघवी बाजू मांडणार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Upsa Irrigation Scheme : परभणी, मानवत तालुक्यांत उपसा सिंचन योजना प्रस्तावित

Bullet Train : बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुसाट

Crop Loan : पीककर्ज वाटपप्रकरणी दाखल गुन्हे मागे घ्या

Panchganga Sugar Factory : पंचगंगा साखर कारखान्याच्या वार्षिक सभेला गालबोट, कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी

Electricity Bill Waive : कोल्हापुरातील पाणी संस्थांना वीजबिल माफीची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT