Tiger Update  Agrowon
ॲग्रो विशेष

Tiger Update : पाण्याच्या शोधात असलेला वाघ पडला शेतातील विहिरीत

Tiger in Search of Water : पाण्याच्या शोधात गावात आलेल्या वाघामागे रानकुत्रे लागले. त्यामुळे त्यांच्या तावडीतून सुटण्यासाठी पळत सुटलेला वाघ गावाशेजारी असलेल्या एका विहिरीत पडला.

Team Agrowon

Chandrapur News : पाण्याच्या शोधात गावात आलेल्या वाघामागे रानकुत्रे लागले. त्यामुळे त्यांच्या तावडीतून सुटण्यासाठी पळत सुटलेला वाघ गावाशेजारी असलेल्या एका विहिरीत पडला. गुरुवारी (ता. ११) तालुक्यातील कोदेपार गावात ही घटना घडली. वाघ विहिरीत पडल्याची माहिती गावात पसरताच नागरिकांनी गर्दी केली होती. वनविभाग आणि पोलिसांनी घटनास्थळी येत नागरिकांना विहिरीपासून दूर केले.

नागभीड तालुक्यात कोदेपार हे गाव येते. जवळपास चारशे ते पाचशे लोकसंख्या असलेले गाव अगदी जंगलाला लागून आहे. गेल्या काही दिवसांपासून ऊन चांगलेच तापू लागले आहे. त्यामुळे जंगलातील नाले, पाणवठे कोरडे पडू लागले आहे.

त्यामुळे पाण्याच्या शोधात वन्यप्राणी गावात येऊ लागले आहे. गुरुवारी दुपारच्या सुमारास एक वाघ पाण्याच्या शोधात गावाकडे येत होता. याचदरम्यान रानकुत्रे गावात आले. त्यांनी डुकरांची शिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, डुकरे त्यांच्या हाती आली नाही. त्यामुळे रानकुत्रे गावाशेजारीच होते. दुपारी दीड ते दोन वाजतादरम्यान वाघ आला.

वाघ दिसताच रानकुत्रे त्याच्यामागे लागले. रानकुत्र्यांची टोळी मागे लागल्याने वाघ गावाकडे पळत सुटला. जंगलाशेजारीच नामदेव कोडापे यांची शेती आहे. त्यांच्या शेतात असलेल्या विहिरीत वाघ पडला. दुपारी कोडापे शेताकडे आले. तेव्हा त्यांना वाघ दिसला. त्यांनी लगेच याची माहिती वनविभाग आणि पोलिसांना दिली.

माहिती मिळताच वनपरिक्षेत्राधिकारी सुनील हजारे आणि पोलिस निरीक्षक विजय राठोड चमूसोबत घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी विहिरीजवळ जमलेली गर्दी कमी केली. त्यानंतर विहिरीत टिनाचे पत्र दोर बांधून सोडले. त्याच टिनाच्या पत्रावर वाघ बसला. हळूहळू दोर ओढून वाघाला विहिरीबाहेर काढण्यात आले. विहिरीबाहेर निघताच वाघाने जंगलाकडे धूम ठोकली.

एक तासानंतर सुटका

विहिरीत पडल्याची माहिती मिळताच वनविभागाची चमू घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी विहिरीत टिनाचे पत्र दोर बांधून सोडले. त्याच टिनावर बसून वाघ विहिरीबाहेर आला. या प्रक्रियेला जवळपास एक तास लागला. नागरिकांची गर्दी असल्याने विहिरीबाहेर जाळे लावण्यात आले. वाघ बाहेर येताच जाळे काढण्यात आले. त्यामुळे वाघाने जंगलाकडे धूम ठोकली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahua Processing Business : गोडवा मोहफुलांच्या लाडवांचा

Beekeeping Business : तरुण उद्योजक मित्रांची अमृत मध निर्मिती

Land Circular: भोगवटादार वर्ग-२ जमिनींसाठी परिपत्रक

Soil and Water Engineering: मृदा, जलसंवर्धनामध्ये अभियांत्रिकी तंत्राचा वापर

Farmer Injustice: शेतकरी नावडे सर्वांना

SCROLL FOR NEXT