Solapur University News Agrowon
ॲग्रो विशेष

Solapur University News : सोलापूर विद्यापीठात वारकरी संप्रदायाचे अभ्यास केंद्र उभारणार

Punyashlok Ahilya Devi Holkar University : पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात वारकरी संप्रदायाचे अभ्यास केंद्र निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Team Agrowon

Solapur News : पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात वारकरी संप्रदायाचे अभ्यास केंद्र निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय ज्ञान, परंपरा, संस्कृती जोपासणाऱ्या पंढरपूरच्या वारीची कीर्ती जगभरात आहे. यावर अधिक अभ्यास व संशोधन करण्याच्या उद्देशाने विद्यापीठात वारकरी संप्रदायाचे केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक प्रभारी कुलगुरू प्रा. डॉ. राजनीश कामत यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच झाली.

या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याचबरोबर जागतिक स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या अरुण राठोड या खेळाडूच्या संपूर्ण खर्चासाठी अंदाजे दोन लाख रुपये देण्याच्या विषयास मान्यता देण्यात आली. तसेच विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सभागृहास राष्ट्रमाता जिजाऊ यांचे नाव देण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.

या बैठकीस प्र-कुलगुरू डॉ. गौतम कांबळे व व्यवस्थापन परिषदेचे सदस्य उपस्थित होते. सदस्य सचिव म्हणून कुलसचिव योगिनी घारे यांनी काम पाहिले.

विद्यार्थ्यांना रोजगारासाठी ‘टीम लीज’बरोबर करार

टीचिंग-लर्निंग सेंटर विद्यापीठात सुरू व्हावे, यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाकडे प्रस्ताव देण्याच्या विषयास मंजुरी देण्यात आली. हे प्रस्ताव सिनेटकडून शिफारस होऊन आले होते. विद्यापीठाच्या पंचवार्षिक बृहत् आराखड्यास व्यवस्थापन परिषदेने दुरुस्तीसह मान्यता दिली.

आता विद्यापरिषद व त्यानंतर अधिसभेच्या बैठकीत हा विषय मांडण्यात येईल. विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाद्वारे रोजगार देण्यासाठी टीम लीज या कंपनीबरोबर सामंजस्य करार करण्यास देखील मान्यता देण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT