Tur Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Tur Production : तुरीच्या उत्पादनात मोठी घट

Tur Crop : तूर पिकाला बेमोसमी पाऊस,रो गराई, वातावरणातील सतत होत असलेल्या बदलामुळे कपाशी, तुरीला मोठा फटका बसला आहे.

Team Agrowon

Jalna News : अंबड तालुक्यात खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेला आहे. शेतकऱ्यांना उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा रब्बी हंगामात होती. मात्र भरपावसाळ्यात पाहिजे तसा पाऊस पडला नाही. नंतर बेमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली.

यामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांची पावसाने अक्षरशः दाणादाण उडविली. त्यातच वातावरणात सतत होत असलेला बद्दल, ढगाळ वातावरण, पसरत असलेली धुई याचबरोबर रोगराई यामुळे जोमात आलेले पीक कोमात जात आहे.

कपाशी, तुरीला मोठा फटका: कपाशी व तूर पिकाला बेमोसमी पाऊस,रो गराई, वातावरणातील सतत होत असलेल्या बदलामुळे कपाशी, तुरीला मोठा फटका बसला आहे. यामुळे उत्पन्नात प्रचंड घट झाली आहे.

तर दुसरीकडे शासनाकडून शेतकऱ्यांच्या शेतमालाला कोणताच हमीभाव जाहीर होत नसल्याने व खासगी व्यापारी बेभावात खरेदी करत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी केलेला खर्चही वसूल होत नाही. यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच आर्थिक कोंडी झाली आहे.

जोमात आलेले तुरीचे पीक अक्षरशः कोमात गेले आहे. बेमोसमी पाऊस, ढगाळ वातावरण, रोगराई यामुळे किडीचा वाढता प्रादुर्भाव वाढत गेल्याने उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होत आहे. यामुळे शेतकरी चांगलाच आर्थिक अडचणीत सापडला आहे.
भालचंद्र भोजने, शेतकरी, मार्डी.
शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी थांबविण्यासाठी शासनाने कापसाची प्रतिक्विंटल दराने कापूस खरेदी करणे गरजेचे आहे. मात्र तसे होताना दिसून येत नाही. बाजारात खासगी व्यापाऱ्यांकडून कापसाची खरेदी सर्रासपणे सात हजार रुपयांच्या आतच प्रतिक्विंटल दराने खरेदी करत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे खर्च आणि उत्पन्नाचे गणित जुळायला तयार नाही. यामुळे शेतकरी पुरता आर्थिक अडचणीत सापडला आहे.
गोवर्धन उगले, शेतकरी. लालवाडी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Lucerne Fodder: एकदा लागवड, तीन वर्षे चारा! पशुपालकांसाठी लसूणघास फायदेशीर

Fruit Insurance Refund: फळ पीकविमा परतावा अप्राप्त

Rabies Prevention Tips: रेबीज रोखण्यासाठी लसीकरणासह जनजागृती आवश्यक

Water Storage: प्रकल्प सलग सातव्या वर्षी १०० टक्के भरले

Fruit Crop Insurance: फळपीक विम्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

SCROLL FOR NEXT