Tur
TurAgrowon

Tur Production : वेळेवर तंत्रज्ञान वापरल्यास तुरीचे दीड पट उत्पन्न

Nandkumar Kute : ‘‘कृषी विद्यापीठांकडून विकसित तुरीच्या सुधारित वाणांचा व शिफारशींचा अवलंब करून तूर पिकाचे व्यवस्थापन केल्यास तुरीचे उत्पन्न दीड पट वाढते,’’ असे प्रतिपादन कडधान्य सुधार प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. नंदकुमार कुटे यांनी केले.
Published on

Nagar News : ‘‘कृषी विद्यापीठांकडून विकसित तुरीच्या सुधारित वाणांचा व शिफारशींचा अवलंब करून तूर पिकाचे व्यवस्थापन केल्यास तुरीचे उत्पन्न दीड पट वाढते,’’ असे प्रतिपादन कडधान्य सुधार प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. नंदकुमार कुटे यांनी केले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कडधान्य सुधार प्रकल्पातील शास्त्रज्ञांनी कुंभारगाव येथील तूर उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या वेळी तूर कीटकशास्त्रज्ञ डॉ. चांगदेव वायळ, रोगशास्त्रज्ञ डॉ. विश्‍वास चव्हाण यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

Tur
Tur Production : तुरीचे उत्पादन यंदा अत्यल्प

डॉ. कुटे म्हणाले, ‘‘तुरीची लागवड वाढावी व तुरीचे उत्पन्न वाढावे म्हणून कडधान्य सुधार प्रकल्पाचे शास्त्रज्ञ जमिनीची व बियाण्यांची निवड, बीजप्रकिया, खत, पाणी, तण व सूक्ष्म अन्नद्रव्ये व्यवस्थापन, किडी व रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन चर्चासत्रे, शिवारफेरी व शेतकरी मेळाव्यांसह विविध माध्यमांद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात.

Tur
Tur Productivity : तूर उत्पादकता चार ते पाच क्विंटल

शेतकऱ्यांनी शिफारशींचे तंतोतंत पालन व तूर पिकाचे व्यवस्थापन केल्यामुळे या वर्षी कुंभारगाव येथील तूर उत्पादकांयांच्या उत्पन्नात दीड पट वाढ होईल.’’ डॉ. वायळ म्हणाले, ‘‘तूर पिकावर २५० पेक्षा जास्त किडींचा प्रादुर्भाव होत असल्याची नोंद आढळली आहे. वेळीच या किडींचे नियंत्रण करू शकलो नाही, तर ३० ते ४० टक्क्यांपेक्षा जास्त उत्पन्नात घट ही केवळ तुरीवरील किडींच्या प्रादुर्भावामुळे होते.

चिकट सापळे, कामगंध सापळे, पक्षिथांबे, ५ टक्के निंबोळी अर्क आणि ‘एचएएनपीव्ही’ची फवारणी याचा प्रभावीपणे अवलंब केल्यामुळे आणि कुठलेही रासायनिक कीडनाशक न फवारता देखील किडींचे अत्यंत चांगल्याप्रकारे व्यवस्थापन व नियंत्रण केल्यामुळे शेतकऱ्यांना एकरी १४ क्विंटलपेक्षा जास्त उत्पादन मिळू शकेल.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com