Ravindra Ingle Agrowon
ॲग्रो विशेष

Parbhani News : बोलीभाषांचे शास्त्र निर्माण व्हावे : रवींद्र इंगळे

आचार आणि विचार नियंत्रण करते ती भाषा. भाषेत ज्ञानाचे संकलन‌ झाले त्या वेळी विकास झाला.

Team Agrowon

Parbhani News : आचार आणि विचार नियंत्रण करते ती भाषा. भाषेत ज्ञानाचे संकलन‌ झाले त्या वेळी विकास झाला. भाषेचे खरे शास्त्र त्याच बोली भाषेत आहे. त्यामुळे बोलीभाषांचे शास्त्र निर्माण झाले पाहिजे‌, असे प्रतिपादन कवी, नाटककार, भाषा अभ्यासक रवींद्र इंगळे चावरेकर यांनी केले.

परभणी येथील कवी डॉ. केशव खटिंग यांच्या पुढाकाराने स्थापन केलेल्या ‘मराठवाडी बोली बोलू कवतुके’ या व्हॉट्सॲप ग्रुपतर्फे रविवारी (ता. १६) वालूर (ता. सेलू) येथे शब्द मेळा घेण्यात आला.

अध्यक्षस्थानी ‘सकाळ’च्या मराठवाडा आवृत्तीचे संपादक दयानंद माने, स्वागताध्यक्ष डॉ. संतोष बोंढारे, डॉ. संजय लोंढे आदींची उपस्थिती होती.

चावरेकर म्हणाले, की सर्व भेदाभेद विसरून हा बोली भाषेचा ग्रुप संवाद साधणारा भाषेला खऱ्या अर्थाने जपणारा आहे. भाषेला दुहेरी रूप आहे. बोलीभाषा आकारास येत असल्यामुळे बोलीचे शास्त्र, दर्जा अधोरेखित होत आहे.

शेतकरी विठ्ठलराव खटिंग, सालदार दिगंबर साखरे, रंगराव भिसे, दिमडी वादक लक्ष्मणराव भिसे, बोली भाषेचे शब्द संग्रह करणारे छबुदास भांडवलकर यांचा सत्कार करण्यात आला.

प्रास्ताविक डॉ. केशव खटिंग यांनी तर सूत्रसंचालन बबनराव गिनगिने यांनी केले. सुरेश हिवाळे, अशोक उफाडे, माऊली देशमुख, प्रभू शिंदे, डॉ. अशोक पाठक, डॉ. सतीश मगर, शिवदास पोटे, शिवाजी अंबुलगेकर, शरद ठाकर, अरुण चव्हाळ आदींनी पुढाकार घेतला. मराठवाड्यातील लेखक, कवी, कलावंतांची उपस्थिती होती. संगीता देशमुख यांनी आभार मानले.

भाषेसाठी कार्य करणे महत्त्वाचे

दयानंद माने म्हणाले, की आजच्या सोशल मीडियाच्या काळात बोली भाषेसाठी काम करणारा हा ‘मराठवाडी बोली बोलू कवतुके’ समूह महत्त्वाचे योगदान देतो आहे.

मोबाईलच्या या काळात जगात रोज एखादी भाषा मरतेय, अशात भाषेसाठी कार्य करणे महत्त्वाचे आहे. सगळ्या गोष्टींची सुरुवात प्रेमातून होते. त्यामुळे भाषेवर, माणसावर, या भूमीवर प्रेम करा म्हणजे राष्ट्र उभे राहील.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT