Kerla Elephant Death Agrowon
ॲग्रो विशेष

Kerla Elephant Death : निर्दयी माणूस अन् प्रेमळ प्राणी

Elephant Death In River : ती भुकेने व्याकूळ असते. ती खाण्याच्या शोधात असताना तिला कुणीतरी फटाक्यांनी भरलेला अननस खाऊ घालतो. तोंड आणि जीभ फाटलेल्या अवस्थेत ती आजूबाजूच्या कुठल्याही माणसाला, इमारतीला इजा न करता पाण्याच्या शोधार्थ चालत राहते.

Team Agrowon

प्राजक्त देशमुख

खरे तर हा प्रसंग दीड-दोन वर्षांपूर्वीचा आहे, पण आजही वाचला की हृदय पिळवटून जातं. सायलेंट व्हॅलीमधून एक हत्तीण पलक्कड जिल्ह्यात येते. ती भुकेने व्याकूळ असते. ती खाण्याच्या शोधात असताना तिला कुणीतरी फटाक्यांनी भरलेला अननस खाऊ घालतो. तोंड आणि जीभ फाटलेल्या अवस्थेत ती आजूबाजूच्या कुठल्याही माणसाला, इमारतीला इजा न करता पाण्याच्या शोधार्थ चालत राहते. चालत राहते. चालत राहते. ती वेल्लियार नदीच्या मधोमध जाऊन निश्‍चल उभी राहते.

तिला मदत करण्यासाठी वनविभागाचे अधिकारी मोहन हे निलकांथन आणि सुरेंद्रन, दोन हत्ती आणतात. जेणेकरून ते तिला पाण्यातून बाहेर येण्याचा मार्ग दाखवतील. सहसा अशा मार्गाने पुरात अडकलेले हत्ती वाचवले जातात. आणि कदाचित माणसांवर तिचा विश्‍वासही राहिला नसेलच. लहानपणीच्या एका भेटीवर हा प्राणी नंतर कित्येक वर्षांनी तुम्हाला आोळखू शकतो. तिथे काही तासांपूर्वी अननस देण्यासाठी प्रेमाने चुचकारलेल्या माणसांचा तो चुचकारा तिच्या अजस्र कानात ताजा असेलच!

ती नदीबाहेर येत नाही. तिला काहीतरी कळालं असावं. किंवा धक्क्यातून ती सावरलेली नाहीय. ती हालत नाही. ती नदीत तोंड खुपसून तशीच स्तब्ध उभी असते. वनविभागाच्या अनेक प्रयत्नांनंतरही ती वाहत्या नदीत तिथेच सायंकाळी चार वाजता उभ्या उभ्या प्राण सोडते. ती जलसमाधी घेते.

पोस्टमोर्टमनंतर डॉक्टर म्हणतात ‘ती एकटी नव्हती.’ ती गर्भवती असते. एवढा मोठा प्राणी आपली भूक सहन करू शकतो, पण कदाचित ती पोटातल्या जिवासाठी ती सायलेंट व्हॅलीतून बाहेर पडलेली असते. संशोधकांच्या मते, हत्ती आपल्या कळपातलं कुणी वारलं तर त्यांवर अंतिमसंस्कार करतात. नंतर सगळे स्मृतिस्थळी भेटी देऊन शोकही व्यक्त करतात. त्यांच्या मेंदूची जडणघडण ही मनुष्यासारखी असल्याने मनुष्यासारख्याचं त्यांना भावभावना-स्मृती असतात.

हे घडलं, २७ मे २०२० ला. वनअधिकारी मोहन कृष्णन यांनी ‘माफ कर बहिणी, माफ कर’ अशी सुरुवात करून हा प्रसंग जगाला सांगितलाय. वेल्लियार नदीच्या खळाळत्या पाण्यात जलसमाधीसाठी उभी असताना तिच्या मनात काय काय येऊन गेलं असेल? हे कळण्याइतपत विज्ञान प्रगत न होवो. ‪

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paus Andaj: आज, उद्या पावसाची शक्यता; मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता

Okra Farming: भेंडी पीक काढणीला गती; शिवार खरेदीत २५ रुपयांपर्यंत दर

Grain Drying: धान्य वाळविण्यासाठी काळ्या रंगाची ताडपत्री फायदेशीर

Shetkari Samvad Yatra: शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी बच्चू कडू यांची उद्यापासून राज्यभर शेतकरी संवाद यात्रा

Maize Crop Loss: सलग पावसामुळे मक्याचा चारा कुजला

SCROLL FOR NEXT