Team Agrowon
महाराष्ट्रात हत्ती दिसणे म्हणजे तशी दुर्मिळ बाब आहे. कधीमधी शेजारच्या राज्यातून हत्तींचा कळप आला तर गोष्ट वेगळी आहे.
पण तुम्हाला माहितीय का गडचिरोली जिल्ह्यात असं एक ठिकाणी आहे. जिथं सहा दशकांपासून हत्तींचे अस्तित्व कायम आहे.
हेमलकसाला येणारे पर्यटक हे गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर कॅम्पमध्ये हत्ती पाहण्यासाठी येत असतात.
या कॅम्पमध्ये सध्या ८ हत्ती आहेत. त्यामध्ये ६ मादी आणि २ नर हत्तींसह एका शावकाचाही समावेश आहे.
जंगलात चरण्यासाठी सोडलेल्या हत्तींना दुपारी १२.३० ते १ वाजता कॅम्पवर आणले जाते.
त्याठिकाणी त्याच्या खाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यानंतर हे हत्ती पुन्हा जंगलात परत जातात आणि रात्रभर तेथे असतात.
राज्यभरातून तसेच देशाच्या कानाकोपऱ्यातून या हत्तींना पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करत असतात.