Soybean Rate Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Rate : अकोल्यात सोयाबीन दरात २०० रुपयांची वाढ

Soybean Market : बाजार पेठांमध्ये सोयाबीनच्या दरात २०० रुपयांपर्यंत दरवाढ झाल्याचे सांगितले जात आहे. येथील बाजार समितीत सोयाबीन सरासरी ४३२५ रुपये दरांनी विक्री होत आहे.

Team Agrowon

Akola News : सततच्या पावसाने यंदाच्या हंगामातील सोयाबीन बऱ्याच ठिकाणी पिवळे पडत असून उत्पादन कमी होण्याची शक्यता वाढत आहे. तर दुसरीकडे डीओसीचे फ्यूचर सौदे थोडे तेजीत आल्याने बाजार पेठांमध्ये सोयाबीनच्या दरात २०० रुपयांपर्यंत दरवाढ झाल्याचे सांगितले जात आहे. येथील बाजार समितीत सोयाबीन सरासरी ४३२५ रुपये दरांनी विक्री होत आहे.

गेले काही दिवस दरवाढीच्या मुद्यावर सोयाबीन उत्पादक पट्ट्यात समाज माध्यमातून लोकचळवळ उभारली जात आहे. सोयाबीनला किमान ६ हजारांचा दर हा शेतकऱ्यांचा हक्क असल्याची जनजागृती केली जात आहे. अशातच बाजारात आता सोयाबीनच्या दरात थोडी दरवाढ होऊ लागली आहे.

येथे सोयाबीन किमान ३७४५ व कमाल ४४१५ रुपयांपर्यंत विकली. सरासरी ४३२५ रुपयांचा दर मिळाला. बाजारात सोयाबीनची आवक १८६० क्विंटलपर्यंत झाली. यंदा सततच्या पावसाने सोयाबीन पिकाचे नुकसान होण्याची शक्यता वाढू लागली आहे. नवीन सोयाबीनची आवक किमान २ महिन्यांनी होईल, अशी शक्यता आहे.

त्यामुळे डीओसीच्या फ्यूचर सौद्यात थोडी तेजी आली आहे. त्याचे परिणाम बाजारातील सोयाबीन खरेदीवर झाली असे जाणकार सांगत आहेत. बाजारात गेल्या काही दिवसांत सोयाबीनचे दर घटल्याने शेतकरी चिंतातुर झाले होते. सोयाबीनचा दर अवघा चार हजारांपर्यंत घसरला होता. वास्तविक सोयाबीनला शासनाने ४८९२ रुपये आधारभूत किंमत जाहीर झालेली होती. मात्र, हा दर सोयाबीनला मिळत नव्हता. आता आगामी हंगामाच्या तोंडावर थोडीफार दरवाढ झालेली आहे. ही दरवाढ किती दिवस टिकेल, या बाबत बाजारातील जाणकार साशंकता व्यक्त करीत आहेत.

आवक कमी झाली

सोयाबीनची आवक सध्या कमी झालेली आहे. अनेक बाजारांमध्ये जेमतेम आवक सुरू आहे. अकोल्यात दीड ते दोन हजार क्विंटलपर्यंत होत आहे. यापूर्वी ही आवक अधिक व्हायची.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT