Soybean Farmers Issue : सोयाबीन नुकसानग्रस्तांचा सरकारकडूनही अपेक्षाभंग

Farmer Issue Neglect : सरकारकडून अद्याप काहीच प्रतिसाद मिळाला नसल्याने सरकारनेही शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याचे स्पष्ट होत आहे.
Indian Farmer Issue
Indian Farmer IssueAgrowon
Published on
Updated on

Nanded News : कंधार, लोहा तालुक्यांसह इतर तीन तालुक्यांतील सोयाबीन पक्वतेपूर्वीच पिवळे पडून वाळून गेल्यामुळे ९३ हजार हेक्टरचे नुकसान झाले होते. याबाबत प्रशासनाने ८० कोटींच्या मदतीची मागणीही शासनाकडे केली.

परंतु मदत व पुनर्वसन विभागाने मात्र या भरपाईला मंजुरी दिली नाही. याबाबत लोह्याचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी नुकतीच विधानसभेत लक्षवेधी मांडली. याबाबत सरकारकडून अद्याप काहीच प्रतिसाद मिळाला नसल्याने सरकारनेही शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याचे स्पष्ट होत आहे.

Indian Farmer Issue
Farmer Issue : पावसाच्या दडीने शेतकऱ्यांना भरली हुडहुडी

नांदेड जिल्ह्यात मागीलवर्षी सोयाबीनवर यलो मोझॅक हा विषाणूजन्य रोग आणि खोडकुज व मुळकुज या बुरशीजन्य रोगामुळे पिकाला बाधा झाली होती. यामुळे जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार महसूल, कृषी आणि जिल्हा परिषद विभागांनी संयुक्तपणे केलेल्या पंचनाम्यात जिल्ह्यातील ४७८ गावांतील सोयाबीन पिकाला या रोगाची बाधा झाली.

Indian Farmer Issue
Farmer Issue : शेतीची दुरवस्था; राज्यकर्त्यांचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष

यात कंधार, लोहा, मुदखेड, नायगाव व नांदेड या तालुक्यांतील दोन लाख ११ हजार ४४९ शेतकऱ्यांच्या ९३ हजार ६८६ हेक्टर क्षेत्राला बाधा पोहोचल्याचा अहवाल राज्य शासनाला पाठविला. परंतु या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या भरपाईबाबत राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाकडून कार्यवाही झाली नाही.

याबाबत लोहाचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी नुकसानग्रस्तांना भरपाई मिळावी, यासाठी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी (क्रमांक १८८४) मांडली. याबाबत सरकारकडून मात्र उत्तर मिळाले नव्हते. परंतु सोयाबीन नुकसानग्रस्तांना मुद्दा मात्र विधानसभेत पोहोचल्याने याबाबत काही तोडगा निघेल, असे वाटत होते.

मात्र या लक्षवेधीला सरकारने अद्याप कसल्याच प्रकारचा प्रतिसाद दिला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे राज्य सरकारने कंधार व लोहा तालुक्यांतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याची प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com