Turmeric  Agrowon
ॲग्रो विशेष

Turmeric Research Patents : एकाच दिवशी मिळाले १३ आंतरराष्ट्रीय पेटंट

Agriculture Patents : यामध्ये हळद संशोधनाशी संबंधित दहा तर सीएनजी संबंधित तीन पेटंट्सचा समावेश आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : एकाच दिवशी एक-दोन नव्हे तर तब्बल १३ आंतरराष्ट्रीय पेटंट्स मिळविण्याचा अनोखा विक्रम महाराष्ट्रातील संशोधकांच्या चमूने केला आहे. यामध्ये हळद संशोधनाशी संबंधित दहा तर सीएनजी संबंधित तीन पेटंट्सचा समावेश आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील या विक्रमाची नोंद होणार आहे.

नागपूर येथील अजिंक्‍य कोत्तावार यांच्यासह अशफाक पिंजारी, मिलन शहा (अमळनेर, जळगाव) हे गेल्या अनेक वर्षांपासून हळद पिकातील संशोधन क्षेत्रात काम करतात. त्यासोबतच त्यांच्या या संशोधन प्रकल्पाला भरतभाई पटेल (गुजरात) यांनी आर्थिक सहकार्य केले आहे. तर सीएनजी संशोधन क्षेत्रात हर्षल गटकीने (नागपूर) यांचे भरीव कार्य आहे.

या साऱ्यांनी मिळून जर्मनी येथील आंतरराष्ट्रीय पेटंटसाठी ४० प्रस्ताव दाखल केले. त्यापैकी १३ प्रस्तावांना मंगळवारी (ता. ६) एकाच दिवशी मान्यता देण्यात आल्याचे शनिवारी (ता. २४) कळविण्यात आले.

याकरिता मिळाले पेटंट

- १३ पैकी १० पेटंट हे हळद विषयी तंत्रज्ञानासाठी आहेत.

- पारंपरिक पद्धतीत करकुमीन काढल्यास ५० टक्‍केच मिळते. पेटंट प्रक्रियेत थेट ओल्या हळदीपासून थेट करकुमीन काढले जाते. परिणामी याचे आरोग्यविषयक गुणधर्म ऱ्हास पावत नाहीत.

- खाद्यतेलात चिकटावा (व्हेलॉसीटी) असतो त्यामुळे कोलेस्ट्रोल वाढते. ते कमी करण्यासाठी खास ओल्या हळदीपासून तेल तयार करण्यात आले आहे. ते खाद्यतेलात मिक्‍स करावे लागते.

- ओल्या हळदीपासून ऑलिव्ह रिजन हा काळ्या रंगाचा चिकट (डांबराप्रमाणे) घटक मिळतो. या घटकापासून औषधी गुणधर्म असलेले पदार्थ तसेच पीक वाढ उत्तेजक तयार करण्यात आले आहे.

- हळदीची पेस्ट तयार केली आहे. स्वयंपाकात हे वापरता येईल. विविध रुग्णांसाठी हे औषधीयुक्‍त ठरणार आहे.

- व्यवस्थापनातील बदलाच्या आधारे १० ते १५ टक्‍के करकुमीन असलेली पावडर मिळेल. कांडीमध्ये करकुमीन प्रमाण केवळ चार ते पाच टक्‍के असेल परंतु कोच्यामध्ये हे प्रमाण ८ टक्‍केपेक्षा अधिक राहते. परंतु कोच्या विना उपयोगी म्हणून कंपन्या शेतकऱ्यांकडून नाममात्र दरात खरेदी करतात.

- ओल्या हळदीच्या स्लाइसेस (काप) थेट मिक्‍सरमधून काढून त्यापासून घरीच पावडर तयार करता येणार आहे. या काप (स्लाइसेस) या विशिष्ट तापमानावर बॉईल केल्या आहेत.

- हळद काढा

- हळद ज्यूस

- नेपिअर गवताच्या ११ जाती आहेत. त्या क्रॉस करून नवे वाण विकसित केले आहे. त्यातून सीएनजी गॅस मिळविण्यात यश आले आहे. यामध्ये १५ किलो कच्च्या मालापासून एक किलो गॅस मिळतो.

- सीएनजी गॅसच्या वेस्टपासून पॅलेटस आणि ब्रिकेटस थेट तयार होतील.

- कच्च्या मालापासून (इन्झाईम) सीएनजी गॅस तयार करण्याची प्रक्रिया ४० दिवसांची असून ती आठ दिवसांवर आणली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Flood Crop Damage : संकटाच्या काळातही शेतजमिनी घेण्यासाठी चाचपणी

Farmers Protest : काळे आकाश कंदील लावून, अन् काळे फुगे फोडून दिवाळी

Gokul Dairy : म्हैस, गाय दूध खरेदी दरात गोकुळकडून रुपयाने वाढ

Fruit Crop Insurance : आंबा, काजू पीक विमा परताव्यावरून शेतकऱ्यांमध्ये संभ्रम

Animal Vaccination : खानदेशात पशुधन लसीकरण संथच

SCROLL FOR NEXT