Raj Thackeray Agrowon
ॲग्रो विशेष

Raj Thackeray : जमिनीचा तुकडा म्हणजे तुमचे अस्तित्व : ठाकरे

Team Agrowon

Pune News : महाराष्ट्राचा इतिहास हा भूगोलावर अवलंबून आहे. तोच महाराष्ट्राचा भूगोल अडचणीत आहे. पूर्वी इतिहासात जमीन युद्धे करून घेतली जायची, मात्र आता तुम्हाला कळत नाही इतक्या चलाखीनं ती विकत घेतली जातेय. जमिनीचा तुकडा म्हणजे तुमचं अस्तित्व, तेच जर तुमच्याकडून निघून गेलं तर कोण तुम्ही,’’ असा प्रश्‍न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

‘‘जातीपातीसह इतर गोष्टीत इतकं मश्गूल झालो की आपलं स्वत:चं काय हे हरवून गेलो आहोत. महाराष्ट्राला विखरून टाकायचे काम कोणीतरी करतंय,’’ अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

पिंपरी-चिंचवडमध्ये सुरू असलेल्या १०० व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनात राज ठाकरे यांची ‘नाटक आणि मी’ या विषयावरील मुलाखत दीपक करंजीकर यांनी रविवारी (ता. ७) घेतली.

ठाकरे म्हणाले,‘‘ मराठी माणूस इतिहास विसरत चालला आहे. टीव्हीवरील मालिका आणि मोबाइलवरील रिल्स यात तो अडकलेला आहे. मराठी माणसाला इतिहास आहे. तो राज्यकर्ता होता. इतका मोठा इतिहास असूनही आपण सगळं विसरत चाललोय. एकमेकांमध्ये भांडत बसलोय.’’

‘७० वर्षांपासून त्याच त्याच मुद्यांवर निवडणूक’

‘‘आम्ही गेल्या ७० वर्षांपासून त्याच त्याच मुद्यांवर निवडणूक लढतोय. आपण पुढं कधी जाणार आहोत. ही स्थिती असताना कलाकार, चित्रपट, गायक, नाटककार नसते तर या देशात कधीच अराजक आलं असतं. कलाकारांमध्ये हा देश गुंतून पडला. त्यामुळं त्यांचं इतर गोष्टींकडे दुर्लक्ष झालं,’’ असेही ठाकरे म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Value Chain Development Plan : कंत्राटदार साखळी विकास योजना

Mahaagromart E-Portal : ‘महाॲग्रोमार्ट’ला स्कॉच पुरस्कार

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Sugar Factory Repayment : आमची राखीव थकहमी द्या

SCROLL FOR NEXT