Solar Project : ‘गोकुळ’ उभारणार वीज बचतीसाठी सौरऊर्जा प्रकल्प

Save Electricity : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लि., कोल्हापूरने (गोकुळ) सोलर ओपन ॲक्सेस स्कीम अंतर्गत ६.५ मेगावॉट कपॅसिटीचा सौरऊर्जा प्रकल्प लिंबेवाडी (ता. करमाळा, जि. सोलापूर) येथे उभारण्यात येत आहे.
Solar Project
Solar ProjectAgrowon

Kolhapur News : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लि., कोल्हापूरने (गोकुळ) सोलर ओपन ॲक्सेस स्कीम अंतर्गत ६.५ मेगावॉट कपॅसिटीचा सौरऊर्जा प्रकल्प लिंबेवाडी (ता. करमाळा, जि. सोलापूर) येथे उभारण्यात येत आहे.

सार्जन रिॲलिटीज प्रा.लि. पुणे यांच्या वतीने उभा करण्यात आलेल्या सोलर पार्कमध्ये स्वतःची १८ एकर जागा खरेदी करून हा प्रकल्प उभारत असल्याची व यामुळे गोकुळच्या वीजबिलामध्ये वर्षाला तब्बल साडेसहा कोटी रुपयांची बचत होणार असल्याची माहिती ‘गोकुळ’चे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी दिली.

Solar Project
Solar Energy : सौर ऊर्जानिर्मिती फायदेशीर

श्री. डोंगळे म्हणाले, की गोकुळ दूध संघाने विविध माध्यमांतून बचतीचे धोरण अवलंबले असून, संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये कोणकोणत्या बाबींमध्ये बचत करता येईल याचा विचार पुढे आल्यानंतर वीजबिलांच्या बचतीसाठी सौरऊर्जेचा पर्याय समोर आला.

यातूनच मग सौरऊर्जा प्रकल्पासाठी उपयुक्त अशा भौगोलिक स्थितीचा सविस्तर अभ्यासाचा अहवाल अभियांत्रिकी विभाग प्रमुखांकडून घेऊन सोलापूर जिल्ह्यामध्ये हा प्रकल्प राबविण्याचा प्रस्ताव पुढे आल्यानंतर संबंधित कंपनीशी करार करण्यात आला.

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात १८ एकरांवर सौरऊर्जा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गोकुळचे विजेपोटी वर्षाला खर्च होणारे तब्बल साडेसहा कोटी रुपये वाचणार आहेत.

महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीच्या ओपन ॲक्सेस स्कीममधून अशा पद्धतीची सौरऊर्जा निर्माण करून ती वीज मंडळाला पुरवली जाणार आहे. त्याबद्दल्यात वीज मंडळ गोकुळच्या वीजबिलांचा दर कमी करणार आहे.

सध्या दूध संघाला वर्षाकाठी सरासरी वीज बिलाचा खर्च १३ कोटी इतका येतो. यासाठी सोलापूर जिल्ह्यात करमाळा तालुक्यातील लिंबेवाडी जवळ २०० एकरवर पुणे येथील सार्जन रिॲलिटी प्रा.लि.ही कंपनी सौरऊर्जा निर्मिती करत आहे.

यापैकी गोकुळ १८ एकर जागा खरेदी करून या ठिकाणी या कंपनीमार्फत सोलरपार्कमधून रोज साडेसहा मेगावॉट वीज निर्मिती गोकुळ करणार आहे. एकूणच वार्षिक खर्चामध्ये बचत करण्यासाठी गोकुळने नव्या वर्षात टाकलेले हे एक पाऊल आहे.

या ठिकाणी ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारून पूर्ण करून देण्यासह जमीन खरेदीची रक्कम असा हा ३३ कोटी ३३ लाख रुपयांचा प्रकल्प आहे. यातून निर्माण होणारी वीज मंडळाला पुरवल्यानंतर गोकुळला सध्या प्रतियुनिट येणारा खर्च १० रुपयांऐवजी ३ रुपये येणार असून, ही वार्षिक बचत साडेसहा कोटींवर जाणार आहे.

Solar Project
Kolhapur Solar Energy : गडहिंग्लज तालुक्यातील ८७ गावांत सौर प्रकल्पांची उभारणी होणार

याच हिशेबाने केवळ पाच वर्षांमध्ये या प्रकल्पाचा संपूर्ण खर्च वसूल होणार आहे. यासाठी राष्ट्रीय डेअरी डेव्हपमेंट बोर्डाकडे गोकुळने २५ कोटी ४७ लाख रुपये कर्जाची मागणी केली असून, त्याचे हप्ते या बचत झालेल्या रकमेतून अदा केले जाणार आहेत.

सौरऊर्जा प्रकल्पाचा जागेसह खर्च रुपये ३३ कोटी ३३ लाख इतका होणार आहे. या प्रकल्पामुळे गोकुळ मुख्यालयाकडील वीज बिलामध्ये प्रतिवर्षी अंदाजे रुपये ६.५० कोटी इतकी बचत होणार आहे. याची निविदा प्रकल्प झाली असून ३१ जुलै २०२४ पर्यंत प्रकल्प पूर्णत्वास जाऊन ऑगस्ट २०२४ पासून प्रत्यक्षात वीज निर्मिती सुरू होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com